Home Buying Tips:- घरांची खरेदी करणे किंवा घर विकत घेणे हे आताच्या परिस्थितीमध्ये वाटते तितके सोपे नाही. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही. परंतु आता बऱ्याच बँकांच्या माध्यमातून होमलोनची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आल्यामुळे बऱ्याच जणांना घराचे स्वप्न पूर्ण करता येणे आता शक्य झालेले आहे.
परंतु घर घेण्याअगोदर विविध अंगानी तपासणी करणे खूप गरजेचे आहे. कारण लाखो रुपये खर्च करून घर विकत घेतल्यानंतर काही चुकामुळे जर भविष्यात मनस्ताप होत असेल तर पैसे जाऊन उगीचच डोक्याला ताप का करून घ्यायचा? हा मुद्दा यामागे राहतो व त्याकरिता घर खरेदी करणे अगोदर काही गोष्टींची पडताळणी करून घेणे खूप गरजेचे असते
व यामध्ये सगळ्यात महत्वाचे असते मी घेत असलेले घर बेकायदेशीर म्हणजेच अनधिकृत जागेवर बांधलेले तर नाही ना किंवा तलाव नदीच्या जागेवर जर असेल तरी देखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे घराची खरेदी अगोदर काही गोष्टी पाहणे व खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.
घर खरेदी करा परंतु या गोष्टींकडे लक्ष द्या
1- सगळ्यात अगोदर तुमचा बजेट व घराची किंमत यांची सांगड घाला- घर खरेदी करण्याअगोदर तुमचा आर्थिक बजेट ठरवणे खूप गरजेचे आहे. याकरिता अगोदर तुम्हाला ज्या भागामध्ये तुम्हाला घर खरेदी करायचे आहे या ठिकाणाच्या सध्याच्या किमती काय आहेत हे पाहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे बिल्डर तुमच्याकडून त्या ठिकाणी असलेल्या चालू किमतींपेक्षा जास्त रक्कम तर मागत नाही ना हे तुम्हाला कळू शकते व हे तपासल्यानंतर तुम्ही निर्णय घ्यावा.
2- सोयी सुविधा तपासणे- तसेच तुम्हाला ज्या परिसरामध्ये किंवा ज्या ठिकाणी घराची खरेदी करायची आहे त्या ठिकाणी वीज तसेच पाण्याच्या सुविधा कशा पद्धतीच्या आहेत हे पाहणे खूप गरजेचे आहे.
तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का? तसेच परिसरामध्ये दुकाने किंवा मॉल, शाळा वगैरे इत्यादी सुविधा आहेत का हे देखील पाहणे खूप गरजेचे आहे.
3- कागदपत्रांची तपासणी करणे- घराची खरेदी करण्यापूर्वी काही कागदपत्रांची तपासणी करणे खूप गरजेचे असून यामध्ये बिल्डरशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी व सर्व कागदपत्रे योग्य असतील तरच घर खरेदीचा निर्णय घ्यावा.
तुमचे घर अनधिकृत जागा किंवा नदी तलावाच्या ठिकाणी तर नाही ना? अशा पद्धतीने तपासा
तुम्ही ज्याही ठिकाण घर घेत आहात ती जागा वैध आहे का याची खात्री करून घेणे खूप गरजेचे आहे. घर अनधिकृत जागा किंवा नदी तलावाच्या ठिकाणी तर बांधलेले नाही ना? यासाठी तुम्ही कागदपत्रे पाहून चौकशी करणे खूप गरजेचे आहे.
याकरिता सर्वात प्रथम शहराचा मास्टर प्लॅन पाहून घरचे जमीन किंवा नदी,तलावाच्या पात्रात तर बांधलेले नाही याची खात्री करून पहावी. तसेच स्थानिक महसूल कार्यालयाला भेट देऊन जागेचे सर्वेक्षण नकाशे पाहणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही बिल्डर कडून इतर परवानग्याशी संबंधित कागदपत्रे देखील मागू शकता.
खरेदी करा परंतु ही कागदपत्रे नक्कीच तपासा
1- तुम्ही महारेराच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बिल्डर आणि बांधकाम प्रकल्प याविषयीची माहिती मिळवू शकतात व संबंधित प्रकल्पाचे काम किती कालावधीत पूर्ण होईल याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळते.
2- तसेच नगररचना विभागाकडील मास्टर प्लॅन पहावा. या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला कोणते क्षेत्र कशासाठी वर्गीकृत केले आहे याची तंतोतंत माहिती मिळते. जसे की संबंधित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र किंवा जंगल इत्यादी करिता वर्गीकृत आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळते.
3- तसेच बांधकामा करिता जागेचा बिगर शेती परवाना आहे का हे देखील पाहणे गरजेचे आहे.
4- तसेच महानगरपालिका क्षेत्रात प्रकल्प असेल तर इमारत बांधकामासाठीचा महापालिकेने मंजूर केलेला नकाशा आहे का? हे देखील पहावे.
5- पर्यावरणासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र
6- विजपुरवठा तसेच पाणीपुरवठा, रस्ते इत्यादीसाठीचा अधिकाऱ्यांनी दिलेली मंजुरी आहे का हे देखील पहा.
7- इतर आवश्यक परवानग्यांना मंजुरी मिळाली आहे की नाही हे देखील तपासून पहा.