आपल्यापैकी अनेकजण नजीकच्या भविष्यात घर खरेदी करणार आहेत ? कदाचित तुमचाही आगामी काळात स्वतःचे, हक्काचे घर बनवण्याचा प्लॅन असेल. हो ना मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
खरे तर अलीकडे घर खरेदी करणे सोपी बाब राहिलेली नाही. याचे कारण म्हणजे घरांच्या किमती फारच वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवाचा मोठा आटापिटा करून स्वप्नाच्या घरासाठी पैशांची साठवणूक करावी लागते. अनेकदा तर जीवाचा आटापिटा करूनही घर खरेदीसाठी पैसे साचत नाहीत. अनेकांच्या बाबतीत असंच घडतं आणि यामुळे गृह कर्जाचा पर्याय डोळ्यासमोर उभा राहतो.
अनेकांनी गृह कर्ज घेऊन आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. तर काही लोक नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेणार आहेत. दरम्यान, घर खरेदी करणाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात रजिस्ट्रीच्या वेळी आकारल्या जाणाऱ्या स्टॅम्प ड्युटीसाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार नाही. म्हणजे आता स्टॅम्प ड्युटी कमी लागणार आहे. मात्र स्टॅम्प ड्युटी जर कमी भरायची असेल तर घराची खरेदी बायकोच्या किंवा पत्नीच्या नावाने करावी लागणार आहे.
केंद्रातील सरकारने महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटी कमी आकारावी अशा सूचना राज्यातील सरकारांना दिल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील सरकारांना या सूचना दिल्या आहेत. त्यांनी असे सांगितल आहे की, स्टँप ड्युटीचे दर सर्वांसाठीच कमी करण्याचं केंद्र सरकार राज्यांना सांगत आहे.
शिवाय, महिलांच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीवर आणखी कमी स्टँप ड्युटी आकारण्यासाठी विचार करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं जाणार आहे. यामुळे नक्कीच महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकंदरीत जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात घर खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आईच्या किंवा पत्नीच्या नावावर घर खरेदी करू शकतात आणि स्टॅम्प ड्युटी साठी लागणारे हजारो रुपये वाचवू शकतात.
म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार नाही असे नाही, पण महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार असल्याने तुम्ही जर तुमच्या आईच्या किंवा पत्नीच्या नावाने घर खरेदी केले तर याचा तुम्हाला फायदा होणार आहे.