TATA Tech IPO : TATA ची मार्केटमध्ये आजही जादू टिकून आहे. त्याच्या कार्यपध्दतीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. त्यांच्या शेअर्सची आजवर हाय रिटर्न दिले आहेत. त्यामुळे आज लॉन्च होणार TATA Tech IPO काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
परंतु या TATA Tech IPO ने येताच मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आज बाजारात TATA Tech IPO उघडताच गुंतवणूकदारांनी त्यावर अक्षरशः उडी मारली. TATA ग्रुपने 2004 नंतर पहिल्यांदाच कंपनी पब्लिक केली आहे.
TATA Tech ही इंजीनियरिंग सोबतच आपली प्रोडक्टबाबत डिजिटल सेवा देईल. हा आयपीओ येताच अवघ्या 40 मिनिटात फुल झाल्याचे पाहायला मिळाले.
* आकडेवारी वरून लक्षात घ्या डिमांड
या आयपीओची डिमांड त्याच्या आकडेवारीवरून लक्षात येईल. 45 मिलियन शेअर्ससाठी 130.9 मिलियन डिमांड पाहायला मिळाली. टाटा टेकच्या एका शेअरची किंमत तब्बल 475 ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान असू शकते.
टाटाची क्रेझ प्रचंड आहे. अगदी कालची गोष्ट जर पहिली तर या ग्रुपचा आणखी एक शेअर टाटा मोटर्सने काल आपल्या गुंतवणूकदारांकडून 791 कोटी रुपये गोळा केलेत. आता 24 नोव्हेंबर हा आयपीओचा शेवटचा दिवस असणार असून
कंपनी सध्या एनएसईसह बीएसईवरही लिस्टेड होईल असे दिसते. कारण तसा कंपनीचा प्रयत्नही सुरु आहे.
IPO संदर्भात अधिक माहिती
या IPO वर तुम्हाला साधारण 24 नोव्हेंबर दुपारी 4.50 पर्यंत बोली लावता येणार आहे. बर आता प्राईस पाहिली तर कंपनीने IPO साठी 475 ते 500 रुपये इश्यू प्राईस दिली आहे. तुम्हाला बोली लावायची असेल तर किमान 14,250 रुपये गुंतवावे लागतील.
एका लॉटसाठी कमाल 15,000 रुपये आकारले जातील असं अंदाज आहे. तुम्ही वेगवेगळ्या लॉटमध्ये 2 लाख पर्यंत गुंतवू शकता.
* भरपूर कमाईची अपेक्षा
हा शेअर्स लिस्ट होताच दहा हजार पर्यंत कमावून देऊ शकतो असा अंदाज आहे. भविष्यात या शेअर्सच्या किमती जास्त वाढतील असा अंदाज आहे. तसा टाटा ग्रुपचा इतिहास देखील आहे.