स्पेशल

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी देईल 7.5 लाख रुपये पर्यंत कर्ज! वाचा लागणारी कागदपत्रे आणि पात्रता

Published by
Ajay Patil

मुला-मुलींचे शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट असून व्यक्तिगत विकासापासून ते देशाचा विकास या शिक्षणाच्या गंगेवर अवलंबून आहे. त्यामुळे मुला मुलींचे शिक्षण होणे खूप गरजेचे आहे. समाजामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक हुशार मुला मुलींना बौद्धिक क्षमता असून देखील पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा मुला मुलींचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबवण्यात येतात. अशा उपाययोजनांचा भाग म्हणून वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

तसेच विविध बँकांच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज देखील आता उपलब्ध होऊ लागल्यामुळे उच्च शिक्षण घेणे आता सहज आणि सोपे झाले आहे. जर आपण केंद्र सरकारच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये सरकारने सुरू केलेली पंतप्रधान विद्यालक्षमी योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेचे फायदे मुलींसोबतच मुलांना देखील उपलब्ध आहेत.

पंतप्रधान विद्यालक्षमी योजनेतून शिक्षणासाठी मिळते आर्थिक मदत

पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण घेता यावे  याकरिता साडेसात लाख रुपये पर्यंत आणि विदेशात शिक्षणासाठी 15 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते व या खर्चाचा व्याजदर बँकेनुसार बदलू शकतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- पंतप्रधान विद्यालक्षमी योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा दहावी किंवा बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

2- तसेच त्याचा प्रवेश हा मान्यताप्राप्त संस्थेत असावा.

3- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपये पेक्षा कमी असावे.

 लागणारी आवश्यक कागदपत्रे

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र

2- विद्यार्थ्याचे पॅन कार्ड

3- पासपोर्ट आकाराचे फोटो

4- पत्त्याचा पुरावा( आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि विज बिल)

5- आई-वडिलांचा उत्पन्नाचा दाखला

6- दहावी आणि बारावीच्या मार्कशीटची  फोटोकॉपी

7- शिक्षणाचा संपूर्ण खर्चाचा तपशील

 अधिक माहिती करिता कुठे करावा संपर्क?

या योजनेचा फायदा हा गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी होणार असून महिलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून याचे खूप महत्त्व असणार आहे. मुलींप्रमाणेच मुलांसाठी देखील ही योजना शिक्षणासाठी आर्थिक मदत करते व मुलांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी विद्या लक्ष्मी पोर्टलला भेट देऊ शकता.

Ajay Patil