Canara Bank Home Loan : तारीख 7 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय ने पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात केली. आधी रेपो रेट 6.50% इतके होते मात्र या दरात आता 25 बेसिस पॉईंट ने कपात करण्यात आली आहे.
आरबीआयच्या निर्णयानंतर रेपो रेट 6.25% पर्यंत खाली आले आहेत. मध्यवर्ती बँकेचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायद्याचा राहणार आहे कारण की यामुळे आता बँकांच्या व्याजदरात कपात होणार आहे. होम लोन, कार लोन समवेत सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.

यानुसार आता बँकांनी कर्जाचे व्याजदर घटवण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक बँकांनी होम लोन वरील व्याजदरात गेल्या काही दिवसांमध्ये कपात केली असून यामध्ये कॅनडा बँकेचा देखील समावेश होतो.
कॅनरा बँकेचे सध्याचे होम लोन वरील व्याजदर
खरे तर सध्या कॅनडा बँक आपल्या ग्राहकांना 8.15% पासून ते 11% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना बँकेकडून किमान 8.15% इंटरेस्ट रेटवर होम लोन दिले जात आहे.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर ग्राहकांना लवकरात लवकर कर्ज मंजूर होते आणि कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.
दरम्यान जर कॅनडा बँकेकडून किमान 8.15 टक्के व्याजदरात एखाद्याला वीस वर्षांसाठी 45 लाखांचे गृह कर्ज मिळाले तर त्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याच कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात.
45 लाखांच्या गृह कर्जासाठी किती रुपयांचा हप्ता?
जर कॅनरा बँकेकडून 8.15% व्याजदरात वीस वर्षांसाठी 45 लाखांचे गृह कर्ज मिळाले तर ग्राहकांना 38 हजार 61 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. अर्थात ग्राहकांना या कर्जासाठी एक कोटी 14 लाख 18 हजार 300 रुपये भरावे लागणार आहेत.
यामध्ये 69 लाख 18 हजार 300 रुपये व्याजाची रक्कम राहणार आहे. पण यात फक्त मुद्दल आणि व्याज यांचा समावेश आहे. या कर्जासाठी लागणाऱ्या प्रोसेसिंग फीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.