Car Insurance:- कुठलेही वाहन असले तर त्यासाठी इन्शुरन्स म्हणजेच विमा घेणे खूप गरजेचे असते. कारण वाहन हे रस्त्यावर चालणारे असल्याने कुठल्याही कारणाने किंवा कुठल्याही अपघातामुळे त्या वाहनाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
अशावेळी जर वाहनाचे नुकसान झाले तर त्यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून इन्शुरन्सची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. वाहन इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा असून आपल्याला त्याचे अनेक प्रकार दिसून येतात.
परंतु या सगळ्या प्रकारांमध्ये जर वाहन इन्शुरन्स हा प्रकार पाहिला तर या प्रकारांमध्ये आपल्याला वाहनासाठी संपूर्ण कव्हर मिळतो असा इन्शुरन्स काढणे खूप गरजेचे असते.
त्यामुळे योग्य कंपनीकडून वाहनाचा संपूर्ण कव्हर मिळेल अशा प्रकारचा इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे असते. वाहन इन्शुरन्सचे प्रकार पाहिले त्यामध्ये झिरो डेप्थ इन्शुरन्स हा प्रकार पाहिला तर तो खूप महत्त्वाचा असून याच इन्शुरन्सची माहिती आपण लेखात बघू.
कसे आहे झिरो डेप्थ इन्शुरन्सचे स्वरूप?
हा मोटर इन्शुरन्स पॉलिसी मधील एक महत्त्वपूर्ण प्रकार असून यामध्ये जर कारचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर यामध्ये तुम्हाला नुकसान झाल्याची संपूर्णपणे किंमत दिली जाते व कोणताही घसारा वजा केला जात नाही.
यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून कारचे जे काही नुकसान झालेले असते त्याचा संपूर्ण दुरुस्तीचा खर्च कव्हर केला जातो. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त पैसा द्यावा लागत नाही.
झिरो डेप्थ इन्शुरन्सचे मिळणारे फायदे
1- या विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कारचे बंपर, टायर तसेच प्लास्टिक व फायबर इत्यादी सर्व भागांच्या दुरुस्तीचा खर्च दिला जातो.
2- जर आपण सामान्य विमा पॉलिसी बघितल्या तर यामध्ये कारचे जे काही पार्ट म्हणजेच भाग असतात त्यांचे मूल्य हे त्यांच्या वापरानुसार कमी होते व त्यालाच आपण घसारा म्हणत असतो. परंतु झिरो डेप्थ पॉलिसीमध्ये घसारा वजा न करता संपूर्ण खर्च दिला जातो.
3- एखाद्या वेळेस कारचा अपघात झाला तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान सहन करण्याची आवश्यकता राहत नाही. कारण या इन्शुरन्स प्रकारामध्ये तुम्हाला कंपनीकडून कारचा दुरुस्तीचा संपूर्ण खर्च मिळतो.
दावा केल्यावर मिळतो कार दुरुस्तीचा संपूर्ण खर्च
एखाद्या वेळेस कारचा अपघात झाला व तुमच्याकडे जर झिरो डेप्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर दावा केल्यावर कारच्या दुरुस्तीचा पूर्ण खर्च दिला जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या अपघातामध्ये जर कारचे बंपर, हेडलाईट तसेच मिरर इत्यादी जरी खराब झाले असतील
तरी त्याचा दुरुस्तीचा किंवा असे भाग बदल करण्याचा संपूर्ण खर्च विमा कंपनीद्वारे कव्हर केला जातो. कुठलाही घसारा शुल्क देखील तुम्हाला द्यावे लागत नाही व तुमचा खर्च संपूर्णपणे शून्यावर असतो. ही पॉलिसी नवीन कारसाठी खूप उपयुक्त ठरते.