Car Mileage Tips:- कुठल्याही वाहन घेताना किंवा ते वाहन वापरताना त्या वाहनाने दिलेले मायलेज खूप महत्त्वाचे असते व या मायलेजचा परिणाम थेट आपल्या खिशावर पैशांच्या दृष्टिकोनातून होत असतो. आपण वापरत असलेली कार किंवा बाईकचे मायलेज जर कमी असेल तर मात्र आपल्याला इंधनावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो व मोठ्या प्रमाणावर पैसा यामध्ये वाया जात असतो.
त्यामुळे कार घेताना प्रत्येक जण असलेले मायलेज विचारात घेऊनच कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात. जेव्हा आपण नवीन कार घेतो तेव्हा तिचे मायलेज अपेक्षेप्रमाणे असते व कालांतराने कार जेव्हा जुनी होते तेव्हा मात्र मायलेज कमी होण्याची शक्यता असते.
परंतु अशा पद्धतीने जुनी कार जरी तुम्ही वापरत असाल तर काही छोट्या-मोठ्या गोष्टींवर जर लक्ष दिले तर अशा कारचे मायलेज वाढवणे देखील शक्य असते.
अशा मायलेज वाढवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी पाहिल्या तर यामध्ये बऱ्याच कारमध्ये असलेले क्रूझ कंट्रोल हे छोटेसे वैशिष्ट्य म्हणजेच फीचर जर व्यवस्थित रित्या वापरले तर याद्वारे तुम्ही कारची मायलेज उत्तम प्रमाणात वाढवू शकतात. याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
क्रूझ कंट्रोल नेमके कशाला म्हणतात व मायलेज सुधारण्यासाठी कसे काम करते?
क्रूज कंट्रोल हे असे वैशिष्ट्य आहे की यामुळे तुम्ही तुमच्या कारचा वेग अतिशय स्थिर प्रमाणामध्ये ठेवू शकता व यामुळे वारंवार वेग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा जो काही दबाव इंजिनवर येतो तो येत नाही व त्यामुळे इंधन वापरावर चांगला परिणाम पाहायला मिळतो. जेव्हा वाहनाचा वेग हा स्थिर असतो तेव्हा इंजिनला देखील उत्तम पद्धतीने काम करणे शक्य होते व इंधनाचा वापर कमी होऊन मायलेज सुधारते.
आपण क्रूज कंट्रोल ऍक्टिव्ह करतो तेव्हा ड्रायव्हरला परत परत एक्सेल लेटर देण्याची गरज भासत नाही व ड्रायव्हरला देखील आरामशीर ड्रायव्हिंग करता येते. जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर क्रूझ कंट्रोलचा वापर करून कार इंधन कार्यक्षम बनवू शकतात. या क्रूज कंट्रोल चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर केल्यामुळे कार ओव्हर स्पीडिंग होत नाही व यामुळे इंजिनचा ताण कमी होतो व इंधनाचा वापर देखील कमी होतो.
तुम्ही सतत योग्य वेगामध्ये गाडी चालवता व यामुळे होणारा हवेचा प्रतिकारचा प्रभाव देखील कमी व्हायला मदत होते व त्यामुळे मायलेज सुधारते. जर कारमध्ये हायब्रीड किंवा इको मोड असेल व तुम्ही जर क्रूज कंट्रोल वापरले तर हे मोड अधिक प्रभावशाली होतात व मायलेज वाढण्यास मदत होते.
तुमच्या कारमध्ये जर क्रुझ कंट्रोल नसेल तर वाहन वेगात चालवता तेव्हा वारंवार त्यामध्ये चढ-उतार होत असतात व अशा चढ-उतार होण्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. मात्र क्रूज कंट्रोल जर असेल व ते तुम्ही ऍक्टिव्ह केले तर वाहन वेगात चालवत असताना वेगात होणारे चढ उतार कमी करता येतात व इंधनाचा वापर कमी होतो.
आता बऱ्याच वाहनांमध्ये नवीन क्रुझ कंट्रोल फीचर देण्यात आलेले आहे व हे फीचर वाहतुकीनुसार वेग कंट्रोल म्हणजे समायोजित करते. त्यामुळे ट्रॅफिक मध्ये देखील इंधनाची योग्य बचत होऊ शकते. अशाप्रकारे क्रूज कंट्रोलमुळे इंधनाचा वापर कमी होऊन खिशावरील आर्थिक दृष्टिकोनातून पडणारा भार देखील कमी होतो व पैशांची दीर्घकालीन बचत होते.