‘ह्या’ शेतकर्‍याकडून सेलिब्रिटी विकत घेतात घोडीचे दूध ;आज आहे करोडोंचा मालक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- आपल्या शरीरासाठी दूध खूप फायदेशीर आहे. डॉक्टरही मुलांपासून ते वृद्धांपर्यंत दूध पिण्याची शिफारस करतात. तुम्ही म्हशीचे दूध प्या किंवा गायीचे त्याचा तुम्हाला फायदाच होईल.

भारत व्यतिरिक्त इतर देशांमध्ये बकरी आणि मेंढीचे दुधही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. परंतु आज आम्ही आपल्याला एका प्राण्याच्या दुधाच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल आपण कधीही विचार केला नसेल. एक शेतकरी गाय किंवा म्हशीचे नव्हे तर घोडीचे दूध विकतो. हा शेतकरी घोडीचे दूध विकून करोडपती झाला आहे.

 सेलिब्रेटी खरेदी करतात घोडीचे दूध :- ज्या शेतकऱ्यांबद्दल आपण बोलत आहोत तो भारतीय नसून तो यूकेचा आहे. बर्‍याच सेलिब्रिटी या युकेच्या शेतकर्‍याकडून घोडीचे दूध खरेदी करतात. हा शेतकरी आज घोडीच्या दुधाच्या धंद्यातून कोट्यवधींचा मालक आहे. या शेतकर्‍याकडे फक्त 14 घोडी आहेत. पण घोडीचे दूध खूप महाग आहे, म्हणून त्याची कमाई खूप जास्त आहे.

घोड्यांच्या दुधाची मागणी वाढत आहे:-  द टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटेनच्या सॉमरसेट मधील शेतकरी फ्रँक शेलार्ड ने घोडीचा दुध व्यवसाय सुरू केला. आता तो लक्षाधीश झाला आहे. खरं तर, युकेमध्ये घोडीच्या दुधाची मागणी खूप वेगवान नोंदली गेली आहे. शेलार्डच्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे. हे लक्षात घेता ते आपला व्यवसाय वाढविण्यावर भर देत आहेत.

एक किलो दुधाची किंमत किती आहे ?:-  फ्रँक 250 मिलीच्या पॅकमध्ये घोडीचे दूध विकतो. पण या छोट्या दुधाच्या बाटलीची किंमत भारतीय चलनात 632 रुपये आहे. अशाप्रकारे, एक लिटर घोडीच्या दुधाची किंमत 2,628 रुपये होते.

फ्रँकच्या ग्राहकांची संख्या किती आहे ? :- फ्रँकचे 150 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. परंतु यामध्ये यूकेच्या बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. फ्रँकच्या मते, तो घोडीचे दिवसाला 1 लिटर दूधही पितो. त्यांच्या मते, घोडीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे, ज्यामुळे फ्रँकची प्रकृती सुधारली आहे.

घोडीचे दूध कमी चरबीयुक्त असते :- घोडीच्या दुधात चरबी कमी असते. दुसरे म्हणजे, त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते. फ्रँकच्या कुटुंबातील बरेच सदस्य घोडीचे दूध पितात. घोडीचे दूध जगातील सर्वात महाग दूध आहे. फ्रॅंकला त्याच्या मालकीच्या घोड्यांमधून दिवसाला 12-14 लिटर दूध मिळते.

काय काय तयार होते ? :- घोडीचे दूध पिण्याव्यतिरिक्त याचा उपयोग हॅन्ड क्रीम आणि लोशन तयार करण्यासाठी वापरले जाते. फ्रँक असा दावा करतो की जगभरात 32 दशलक्ष लोक घोडीचे दूध पितात, यात बहुतेक मंगोल लोक आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24