लाडकी बहिण योजनेच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल ! आता 1,500 रुपये मिळवणे आणखी सोपे, योजनेत बदल काय झाला ?

Pragati
Published:
ladaki bahin

नुकत्याचं काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. यानंतर या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.

अर्थात या अंतर्गत वार्षिक 18,000 रुपयाचा लाभ पात्र महिलांना मिळणार आहे. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे. अर्थातच अर्ध भरण्याचा अजून एका महिन्याहून अधिकचा काळ बाकी आहे.

अशातच, आता या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल केला आहे. या बदलामुळे या अंतर्गत दिले जाणारे पंधराशे रुपये मिळवणे आणखी सोपे होणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण सरकारने या योजनेच्या नियमात नेमका कोणता बदल केला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

जसं की आपणास ठाऊकच आहे की या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरले जात आहेत. दरम्यान आता सरकारने ऑफलाईन अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी एका अटीत सूट दिली आहे. खरंतर या योजनेसाठी अर्ज करताना महिलांचा फोटो घ्यावा लागतो. ऑनलाइन अर्ज करताना नारीशक्ती दूत अँपवर थेट फोटो घेता येतो.

पण, फोटोवरचा फोटो काढावा लागत नाही. अर्ज करतांनाचं फोटो काढायचा आहे. पण ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचे फोटो नेमके कसे अपलोड करायचे? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. कारण की, ग्रामीण भागातील असंख्य महिला ऑफलाईन अर्ज करत आहेत. यामुळे या महिलांना ऑनलाईन फॉर्म

भरताना पुन्हा कार्यालतात बोलावून फोटो काढावे लागणार होते. परिणामी, पुन्हा सरकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. परिणामी असे घडू नये अन महिलांना वेळेत अर्ज सादर करता यावेत यासाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जावरील फोटोच ग्राह्य धरण्याचा निर्णय़ घेतला असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. परिणामी ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News