Cheapest Foreign Trip : नुकताच दिवाळीचा सण संपला आहे. दिवाळीनंतर अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत असतील. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
विशेषता ज्यांना परदेशात पिकनिक साठी जायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण अशा काही देशाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे अवघ्या चाळीस हजार रुपये खर्च करून फिरता येऊ शकते.
हो बरोबर वाचलय तुम्ही अवघ्या चाळीस हजार रुपयांच्या खर्चात तुम्हाला परदेशवारी करता येणार आहे.
मालदीव : जर तुमचाही विदेशात पिकनिकचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी मालदीवचा पर्याय बेस्ट राहणार आहे. मालदीवला तुम्ही कमी खर्चात जाऊ शकता आणि पिकनिकचा एन्जॉय घेऊ शकता.
मालदीव हे भारतीयांचे एक आवडते ठिकाण आहे. इंडिया ते मालदीवपर्यंतच्या फ्लाईट्स तिकीट खूप स्वस्त आहेत. भारत ते मालदीव एकेरी तिकीट 8000 ते 9000 रुपयांना सहज मिळते.
येथे तुम्ही 2000 रुपयांपर्यंत हॉटेल रुम बुक करु शकता. येथे जेवणाची किंमत दररोज 1500 ते 2000 रुपये असू शकते. हा देश भारतीयांसाठी व्हिसा-फ्रि देश आहे.
म्हणजेच तुम्ही जर एकटे जात असाल तर वीस ते पंचवीस हजारात मालदीव फिरू शकता जर तुम्ही जोडीने जात असाल तर तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.
मलेशिया : मलेशिया हे एक आणखी हॉट फेवरेट डेस्टिनेशन. हे डेस्टिनेशन कुटुंबासमवेत तसेच आपल्या जोडीदारासमवेत पिकनिक साठी सर्वात बेस्ट ठरते.
हनिमूनसाठी देखील हे ठिकाण सर्वोत्तम असून या ठिकाणी हनिमूनला जाणाऱ्या जोडप्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. इंडिया ते मलेशियापर्यंत फ्लाईट्सच्या तिकीटाची किंमत 9000 ते 10000 पर्यंत उपलब्ध असू शकते.
दोन जणांसाठी फ्लाईटच्या तिकीटाची किंमत 36000 रुपयांपर्यंत असू शकते. येथे हॉटोल बुकिंग 2000 रुपयांपर्यंत आहेत. म्हणजेच तुम्ही जर जोडीने मलेशियाला जाण्याचा तयारीत असाल तर किमान एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च तुम्हाला येऊ शकतो. जर एकट्याने जाणार असाल तर पन्नास हजार रुपयांपर्यंतचा खर्च तुम्हाला येईल.
श्रीलंका : तुम्हाला विदेशात फिरायला जायचे असेल आणि तुमचा बजेट 50000 पेक्षा कमी असेल तर श्रीलंका तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्यटन ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत ते श्रीलंकेच्या फ्लाइटची तिकिटे 9000 ते 10000 रुपयांपर्यंत उपलब्ध होत असतात. तसेच, श्रीलंका हा भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त देश आहे.
श्रीलंकेत 1500 ते 2000 रुपयांमध्ये तुम्हाला हॉटेल रूम मिळू शकते. दोन लोकांसाठी एका दिवसाच्या जेवणाची किंमत 1000 ते 1500 रुपये असू शकते. म्हणजे अवघ्या चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये तुम्ही श्रीलंका फिरून येऊ शकता. तुम्ही जर जोडीने गेलात तर तुम्हाला अधिकचा खर्च करावा लागू शकतो.