स्पेशल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल २१ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती.

त्यानंतर त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. तब्बल २१ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय निवास्थान वर्षा बंगल्यावर रवाना झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितले.

पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिमागील काही दिवसांपासून मणक्याचा त्रास जाणवत होता.

त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून भाषण करताना दिसले होते. पुढे त्यांचा त्रास अधिक वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office