स्पेशल

Commercial Vehicle: घ्या ‘ही’ 80 एचपीची पिकअप आणि कृषी व दूध व्यवसायात करा भरभराट! दूध व्यवसायासोबत कमवाल लाखोत पैसा

Published by
Ajay Patil

Commercial Vehicle:- शेतकरी म्हटले म्हणजे शेतकऱ्याचे नातं जसं जमिनीशी आहे तसेच ते ट्रॅक्टरशी व मालवाहतूक साठी उपयोगी ठरणाऱ्या पिकअप वाहनाशी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपल्याला माहित आहे की पिकअप हे वाहन अनेक व्यावसायिक कामांसाठी खूप उपयुक्त वाहन असून शेतीत उत्पादित होणारा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी पिकअप खूप फायदेशीर ठरते.

तसेच दूध व्यवसायासाठी देखील पिकअप फायदेशीर ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे तुम्हाला लहान मोठ्या शहरांमध्ये दूध वाहतूक तसेच भाजीपाला बाजारात आणण्यासाठी आणि इतर वस्तूंच्या वितरणाकरिता शक्तिशाली पिकअप खरेदी करायची असेल तर तुम्ही अशोक लेलँड बडा दोस्त i5 ही पीक अप खरेदी करू शकतात व हा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल.

 काय आहेत अशोक लेलँड बडा दोस्त i5 पिकअपची वैशिष्ट्ये?

या पिकअप मध्ये 1.5- लिटर टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन देण्यात आले असून हे इंटरकुलर इंजिन तीन सिलेंडरमध्ये 1478 सीसी क्षमतेसह येथे व ते ८० एचपी पावर आणि 190 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही पीकअप उत्तम दर्जाच्या एअर फिल्टरसह येते व जे इंजिनला धुळीपासून वाचवते.

तसेच ही पीकअप चांगले मायलेज देखील देते व तुम्ही कमीत कमी इंधनात जास्त वापर करू शकता. या गाडीमध्ये 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली असून या पिकअपची लोडिंग क्षमता 2125 किलोग्रॅम आहे.

या पिकअपचा कमाल वेग 80 किलोमीटर प्रतितास इतका ठेवण्यात आला आहे. अशोक लेलँड ने 5025 एमएम लांबी व 1842 एमएम रुंदी आणि 2590 एमएम व्हील बेससह 2061 एमएम उंचीमध्ये ही पिकअप तयार करण्यात आली आहे.

 अशोक लेलँड बडा दोस्त i5 पिकअपची इतर वैशिष्ट्ये

या पिकअपमध्ये पावर असिस्टेड,टील्टेबल कॉलम स्टेरिंग पाहायला मिळते व त्यामुळे अगदी खरबडीत रस्त्यावर देखील आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. या पिकअपमध्ये पाच फॉरवर्ड+ एक रिव्हर्स गिअरसह गीअरबॉक्स दिला आहे.

तसेच डायाफ्राम, सिंगल ड्राय प्लेट, मेकॅनिकल केबल ऑपरेटेड क्लच, मॅन्युअल टाईप ट्रान्समिशन इत्यादी वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत. ही पिकअप व्हेंटिलेटेड डिस्क किंवा ड्रम ब्रेक्ससह येते व त्यामुळे टायर्सवर मजबूत पकड ठेवणे शक्य होते.

 किती आहे अशोक लेलँड बडा दोस्त i5 पिकअपची किंमत?

या पिकअपची भारतातील एक्स शोरूम किंमत दहा लाख 73 हजार ते अकरा लाख बावीस हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली असून आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स यामुळे काही राज्यांमध्ये किमतीत बदल होऊ शकतो. तसेच कंपनीने या पिकअप वर दोन लाख किलोमीटर किंवा पाच वर्षाची वारंटी दिली आहे.

Ajay Patil