कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी ‘हे’ जेल टाळेल गर्भधारणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-   लग्नानंतर पती पत्नीस गर्भधारणा नको असल्यास शरीर संबंधावेळी कंडोमचा वापर केला जातो. बऱ्याच लोकांकडून गर्भनिरोधक गोळ्यां घेतल्या जातात.

यावर आता पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी रिसर्च करून एक नवीन जेल आनले आहे, त्याचा वापर केल्यास गर्भधारणा टाळता येईल.

हे जेल शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येईल. शरीर संबंधांवेळी या जेलचा वापर केल्यास पुरुषांमधील स्पर्मचे प्रमाण अतिशय कमी होते.

त्यामुळे गर्भधारणेची शक्यतादेखील कमी होते. या जेलची निर्मिती करण्यात डॉ. डायना ब्लिथे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशी आहे संशोधनात समोर आलेली माहिती

१) या जेलला एनईएस / टी असे नाव देण्यात आले आहे.

२) हे जेल पुरुष आपल्या पाठीला आणि खांद्यांना लावू शकतात. यानंतर हे जेल त्वचेतून शरीरात प्रवेश करते.

३) जेलमधील सेजेस्टेरॉन पुरुषांच्या शरीरात उपलब्ध असलेल्या टेस्टेस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती थांबवते. त्यामुळे स्पर्म निर्माण होण्याचे प्रमाण काही वेळासाठी खूप कमी होते.

मात्र याचवेळी रिप्लेसमेंट टेस्टेस्टेरॉन शरीर संबंधांसाठी आवश्यक शरीरातील इतर क्रिया सुरूच ठेवते.

४) लवकरच चाचणी करून हे जेल किती प्रभावी आहे, याबाबत जाणून घेतले जाणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24