Categories: स्पेशल

कोरोना चॅलेंज म्हणून टॉयलेट सीट चाटलेल्या त्या तरुणाला झाली कोरोनाची लागण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोना व्हायरस सध्या झपाट्याने पसरत आहे. एकीकडे जगभरात 4 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असताना सोशल मीडियावर कोरोना व्हायरस वर मिम्स आणि चेलेंज केवळ विनोद म्हणून केले जात आहेत.

 टिकटॉकवर कोरोनाबाबत अनेत व्हिडीओ शेअर केले जातात. एवढेच नाही तर कोरोना चॅलेंजही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. जगभरातील अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून हे चॅलेंज स्वीकारले. मात्र आता हेच चॅलेंज त्यांच्या अंगलट आले आहे.

एका तरुणाने कोरोना चॅलेंज म्हणून टॉयलेट सीट चाटल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता हाच तरूण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची थट्टा करणाऱ्या या तरूणाला कोरोनानेच धडा शिकवला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येऊन उपाययोजना करत असताना ही अशी मंडळी सोशल मीडियावर चॅलेंज करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत.]

 कोरोनामुळे आतापर्यत 21,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,68,905 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

198 देशांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तब्बल तीन अब्ज नागरिक लॉकडाऊन असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगातील अनेक देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24