शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेनंतर कापसाचे भाव वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

गेल्या आठवड्या सोबत तुलना केली असता कापसाच्या दरात तीनशे रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. महत्वाची बाब अशी की आगामी काळात बाजारभावात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. आजच्या लिलावात कापसाला सरासरी 7000 ते 7300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Cotton Rate

Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर कापसाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये.

यंदाही कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. विजयादशमीला नवीन कापूस बाजारात आला आणि नव्या कापसाला फारच कवडीमोल दर मिळाला. मात्र आता हळूहळू कापसाचे दर सुधारू लागले आहेत.

गेल्या आठवड्या सोबत तुलना केली असता कापसाच्या दरात तीनशे रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. महत्वाची बाब अशी की आगामी काळात बाजारभावात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

आजच्या लिलावात कापसाला सरासरी 7000 ते 7300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी थोडासा संयम बाळगावा आणि हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विक्री करणे टाळावे असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. बाजार अभ्यासक सांगतात की कापसाची आवक जर कमी राहिली तर नक्कीच बाजारभावात सुधारणा होण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.

आणखी एक दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी नंतर कापुस बाजार भावात सुधारणा होण्यासाठी पोषक परिस्थिती असल्याचा दावा बाजार अभ्यासकांनी केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याची घाई करू नये.

बाजारातील परिस्थिती पाहून आणि आपल्या गरजेनुसार कापूस विक्रीचे नियोजन करावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे. खरे तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कापूस दरात दोनशे रुपयांची वाढ झाली तर दुसरीकडे आवकही वाढली आहे.

म्हणजेच आवक वाढून देखील कापसाच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आलेली दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करू नये.

टप्प्याटप्प्याने आपल्या मालाच्या विक्रीचे नियोजन करावे. एकाच वेळी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढू नये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

उत्पादनात आलेली घट, वाढती मागणी, कापसामधील ओलावा कमी, दर्जेदार कापूस, सीसीआयची खरेदी अशा असंख्य कारणांमुळे सध्या कापूस बाजारासाठी सकारात्मक अशी परिस्थिती असून आगामी काळात कापसाचे दर आणखी वाढू शकतात असा अंदाज काही लोकांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे आता आगामी काळात कापसाला नेमका काय दर मिळणार, फेब्रुवारी नंतर खरंच कापसाचे दर वाढणार का या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe