Cucumber Farming : अलीकडे राज्यातील शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिकीकरणाच्या या युगात राज्यातील शेतकऱ्यांचे हे प्रयोग चांगलेच गाजत असून त्यांना यातून लाखो रुपयांची कमाई होत आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोक देखील शेतकऱ्यांना काळाच्या ओखात आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातुन असाच एक कौतुकास्पद परिवक समोर येत आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काकडीच्या पिकातून मात्र दोन महिन्यात लाखों रुपयांची कमाई केली आहे. तालुक्यातील मौजे नींबूत तेथील श्रीकांत काकडे नामक तरुणाने आपल्या वीस गुंठे शेत जमिनीत मात्र दोन महिन्यात काकडी या हंगामी पिकाच्या शेतीतून दोन लाखांची कमाई केली आहे.
26 वर्षीय श्रीकांत कायमच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. याच नवीन प्रयोगाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या वीस गुंठे शेत जमिनीत जानेवारी महिन्यामध्ये चार फुटी पट्टा पद्धतीने काकडीची लागवड केली. काकडीच्या सागर या जातीची त्यांनी मल्चिंग पेपर अंथरून लागवड केली. विशेष बाब म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. खरं पाहता काकडी हे कमी कालावधीचे पीक आहे.
लागवड केल्यानंतर मात्र तीस दिवसात या पिकातून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. या पिकासाठी श्रीकांत यांनी दोन ते तीन औषधांचीं फवारणी केली, मंडप तयार करून काकडीचे वेल बांधले, मल्चिंग पेपर अंथरले असल्याने पिकात तनाचा प्रादुर्भाव कमी झाला मात्र तरीदेखील दोनदा खुरपणी त्यांनी केली. यामुळे पिकावर रोगराईचे सावट आले नाही. परिणामी उत्पादन खर्चात बचत आणि निरोगी उत्पादन त्यांना मिळाले.
पीक उत्पादित करण्यासाठी मात्र त्यांना तीस ते पस्तीस हजाराचा खर्च आला. 20 गुंठ्यात योग्य नियोजन केले असल्याने विपरीत परिस्थितीमध्ये सात टन एवढे त्यांना काकडीचे उत्पादन मिळालं. मध्यंतरी ढगाळ हवामान आणि थंडीमुळे काकडी पिकाला मोठा फटका बसला आणि यामुळे उत्पादनात घट झाली नाहीतर उत्पादन अजून अधिक मिळाले असते असं श्रीकांत यांनी नमूद केले.
परंतु श्रीकांत यांनी उत्पादित केलेल्या काकडीला 28 रुपये प्रति किलोचा दर मिळाला असल्याने मात्र वीस गुंठ्यात त्यांना दोन लाखाचा नफा मिळाला आहे. म्हणजेच खर्च वजा जाता एक लाख 70 हजाराचा निव्वळ नफा त्यांना अवघ्या दोन महिन्यात राहिला आहे. श्रीकांतच्या शेतीची एक मोठी विशेषता म्हणजे ते कायमच हंगामी पिकांचे शेती करण्यात रस दाखवत असतात.
यापूर्वी त्यांनी पपई आणि आले अशी मिश्र शेती केली आहे. या मिश्र शेतीमधून त्यांना एकरी 37 लाखांची कमाई एका वर्षात झाली होती. निश्चितच या तरुण शेतकऱ्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे.