ग्राहकांनो, अकाउंट असलेल्या बँकेच्या एटीएममधून काढा पैसे अन्यथा मोठा भूर्दंड….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- आपले खाते ज्या बँकेत आहे. त्यांचे बँकेच्या एटीएममधून पैसे काढा. अन्यथा मोठा आर्थिक भूर्दंड पडू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 10 जून 2021 रोजी कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लागू होणारी इंटरचेंज फीस 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे.

बँक ग्राहकाला दरमहा मिळणाऱ्या फ्री एटीएम ट्रांझॅक्शननंतर ग्राहकांना द्यावा लागणाऱ्या ग्राहक शुल्काची कमाल मर्यादा देखील 20 रुपयांवरुन वाढवून 21 रुपये करण्यात आली आहे. इंटरचेंड फीजमध्ये करण्यात आलेली वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

फ्री लिमिटनंतर द्याव्या लागणाऱ्या शुल्कामध्येच ही वाढ झाली आहे. त्यामुळे या मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणं काहीसं महागणार आहे.

भारतीय बँकांच्या संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जून 2019 गठित करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की याआधी ऑगस्ट 2012 मध्ये इंटरचेंज फीजमध्ये बदल करण्यात आला होता.

तर ग्राहकांवर आकरण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये 2014 मध्ये बदल करण्यात आला होता. अशावेळी समितीच्या शिफारसीनंतरच इंटरचेंज फीज आणि कस्टमर चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक आणि एटीएम ऑपरेटरवर एटीएम डिप्लॉयमेंटसाठी होणारा

खर्च आणि देखभाल खर्चासह सर्व भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांसाठी इंटरचेंज फी वाढविली आहे.

केंद्रीय बँकेने गैर-आर्थिक व्यवहारासाठी फी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे, जे 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल. हा आदेश कॅश रीसायकलर मशीनद्वारे केलेल्या व्यवहारांनाही लागू असेल.

अहमदनगर लाईव्ह 24