स्पेशल

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ महिन्यामध्ये होणार डीएत 55% वाढ? कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार

Published by
Ajay Patil

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराशी निगडित असलेल्या महत्वाच्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच प्रवासी भत्ता इतर महत्त्वाच्या भत्त्यांचा अंतर्भाव होतो. कारण या सगळ्या भत्त्यांवरून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरत असते. यामध्ये जर आपण महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा भत्ता कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो.

त्यामुळे लवकरच या महागाई भत्ता वाढी संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे व लवकरच सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे.

 जुलैमध्ये होऊ शकते महागाई भत्त्यात पुन्हा वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पुन्हा जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून एका वर्षात दोनदा महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते व यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्याचा समावेश आहे.

आधी पाहिले तर मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता व यावेळी चार टक्क्यांची वाढ करून तो 46 वरून 50% पर्यंत झाला. सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्यात वाढ करण्यात आली तरी ती वाढ जानेवारीपासूनच लागू झाल्याचे मानले जात होते. आता सरकार सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये महागाई भत्त्यात वाढ करू शकते परंतु तो यावर्षी जुलै पासूनच लागू केला जाईल.

 या पद्धतीने मोजला जातो महागाई भत्ता

सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता मोजण्याचे जे काही सूत्र आहे ते 2006 मध्ये सरकारने बदलले होते व या बदललेल्या नवीन सूत्रानुसार आत्ता महागाई भत्ता मोजला जातो. ते सूत्र म्हणजे…

DA%=[ गेल्या बारा महिन्यांसाठी एआयसीपीआय( आधारभूत वर्ष 2001=100) ची सरासरी -115.76)/115.76]×100 येथे एआयसीपीआय म्हणजे ऑल इंडिया कंजूमर प्राईस इंडेक्स आहे.

 महागाई भत्त्यात किती होऊ शकते वाढ?

सरकारने मार्चमध्ये शेवटचा डीए यावर्षी वाढवला होता होता व तो जानेवारी महिन्यापासून लागू झाला होता व त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. या चार टक्के वाढीसह डीए 50 टक्के झाला व जुलैमध्ये त्यात तीन टक्के ते पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. समजा यामध्ये जर पाच टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता 55% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Ajay Patil