अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान आजच्या सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका एक विजयासह पुढे आहे.
म्हणूनच एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आवाजच सामना जिंकावाचा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना ३१ धावांनी गमावला. विराट कोहलीचे कर्णधारपद असताना भेडसावणारी मधल्या फळीची समस्या पुन्हा बुधवारी समोर आली.
दक्षिण आफ्रिकेने रणनीती आणि कौशल्य या दोन्ही प्रांतांमध्ये भारतावर सरशी साधली. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्या सलामीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत आव्हान राखण्यासाठी टीम इंडियाला शुक्रवारी दुसऱ्या लढतीत कुठल्याही परिस्थितीत जिंकावेच लागेल. दुसरीकडे यजमान संघ सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकून निश्चिंत होण्यासाठी प्रयत्नशील राहील.
संघ :- भारत : के. एल. राहुल (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, जयंत यादव, नवदीप सैनी, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा. ’
दक्षिण आफ्रिका : तेम्बा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, झुबेर हम्झा, जानेमल मलान, एडिन मार्करम, रासी व्हॅन डर डसन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, मार्को जॅन्सन, सिसांडा मगाला, वेन पार्नेल, लुंगी एन्गिडी, जॉर्ज लिंडे, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, तबरेझ शम्सी, कायले व्हेरेने.