स्पेशल

मुंबई-दिल्ली महामार्ग : जगातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे, 1386 किलोमीटर लांब, एक लाख कोटींचा खर्च, ‘या’ राज्यातून जाणार, पहा रूटमॅप

Published by
Ajay Patil

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली मुंबई महामार्ग हा जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. हा मार्ग उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. खरं पाहता या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच सोहना ते दौसा हा उद्या सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. परंतु जेव्हा हा महामार्ग संपूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा दिल्ली ते मुंबई हे अंतर मात्र 12 तासात कव्हर होणार आहे.

याची टोटल लांबी 1386 किलोमीटर राहणार असून यासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. दरम्यान उद्या 229 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. निश्चितच हा मार्ग मनमोहक असा राहणार आहे. 

असा असेल हा महामार्ग

हा महामार्ग 1386 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दिल्ली मुंबई महामार्ग दिल्ली हरियाणा राजस्थान मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य राज्यांना जोडणारा एक प्रमुख दुवा राहणार आहे. यामुळे यावर नमूद केलेल्या राज्यांना डायरेक्ट बेनिफिट होणार असून अप्रत्यक्षपणे देशातील इतरही राज्यांना यामुळे कनेक्टिव्हिटी प्रदान होणार आहे.

परिणामी देशाच्या एकात्मिक विकासाला यामुळे चालना मिळणार असा दावा जाणकारही करत आहेत. वास्तविक हा महामार्ग सहा राज्यातून जातो यात काही नवल नाही तर यामुळे देशातील अग्रगण्य आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्याचा मानस शासनाने आखला आहे.

यामुळे देशातील व्यापारी दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या कृषीदृष्ट्या महत्त्वाच्या अशा कोटा इंदूर जयपूर वडोदरा सुरत यांसारख्या शहरांशी राजधानी मुंबईचा थेट कनेक्ट वाढणार आहे. हा महामार्ग सध्या आठ लेनचा असून भविष्यात 12 लेनपर्यंत याला विस्तारित करता येणे शक्य होणार आहे. या मार्गावर एकूण 40 इंटरचेंज राहणार आहेत.

ब्रेकिंग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन; असा असणार हा मार्ग, प्रत्येक 50 किलोमीटरवर मिळणार ‘या’ सुविधा

Ajay Patil