स्पेशल

कुटुंबाचा प्रचंड विरोध झाला तरीही नाही ऐकले! शिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला मधमाशीपालन व्यवसाय, आज पोहोचला 2 कोटींच्या घरात

Published by
Ajay Patil

Honey- Bee Business:- आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक व्यक्ती असतात की त्यांच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असली तर ती इच्छा किंवा त्यांच्या मनात असलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त ध्येयाचा पाठलाग करत राहतात व प्रचंड कष्टाने ते ध्येय प्राप्त करतात.

अनेक व्यक्तींना एखादा व्यवसाय किंवा कुठली गोष्ट करण्यासाठी कुटुंबाचा देखील प्रचंड प्रमाणात विरोध होतो व हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. अशाप्रकारे एखादी गोष्ट करण्याला जर कुटुंबाचा विरोध झाला तर बरेच जण आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती सोडून देतात.

परंतु काही व्यक्ती असे असतात की कुटुंबाचा किती जरी विरोध असला तरी त्यांना हवी असलेली गोष्ट ते करतातच आणि त्यात यश मिळवतातच.अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण हरियाणातील जगपाल सिंग फोगट यांची जर यशोगाथा बघितली तर हे शाळेत शिक्षक असताना देखील त्यांनी नोकरी सोडून मधमाशीपालन व्यवसाय सुरू केला.

या सगळ्या व्यवसायासाठी कुटुंबाचा मात्र प्रचंड विरोध झुगारून देऊन त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले व आज त्यांचा हा व्यवसाय कोट्यावधींच्या घरात पोहोचला आहे.

अशा पद्धतीने सुरू केला व्यवसाय
हरियाणा राज्यातील जगपाल सिंग फोगट हे एका शाळेमध्ये शिक्षक होते. परंतु कुठलातरी वेगळा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनामध्ये होते व त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. हातातील शिक्षकाची नोकरी सोडून मधमाशी पालन व्यवसाय करणे त्यांच्या कुटुंबाला पटले नाही व त्यांनी विरोध केला.

परंतु तरी देखील त्यांनी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका गावामध्ये मधमाशीपालनाला सुरुवात केली. साधारणपणे 2001 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली व तेव्हा त्यांच्या गावांमध्ये मधमाशी पालन व्यवसाय हा संपूर्ण नवीन व्यवसाय होता. साहजिकच त्यामुळे अनेक लोकांनी त्यांची खिल्ली उडवली व चेष्टा देखील केली.

परंतु कालांतराने मधमाशी पालन व्यवसायाचे बदलते स्वरूप लोकांनी बघितले आणि लोकांचा देखील या व्यवसायाच्या बाबतीतल्या दृष्टिकोनात बदल झाला. विशेष म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये त्यांनी 25 डबे म्हणजेच टिन मधाची विक्री केली व त्या माध्यमातून त्यांना चांगली कमाई झाली. तेव्हा त्यांनी एक टीन दोन हजार रुपयांना विकले.

या माध्यमातून जे उत्पन्न मिळवले ते उत्पन्न त्यांच्या कुटुंबाला गव्हाच्या उत्पन्नातून जे पैसे मिळत होते त्यापेक्षा जास्त होते व तेव्हापासून या व्यवसायात त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली व पूर्ण वेळ मधमाशी पालन व्यवसायाला दिला.

मधमाशी पालन व्यवसायाबद्दल अधिकची माहिती मिळवण्यासाठी ते लुधियाना या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी मधमाशी पालकांना भेटले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका शेतकऱ्याकडून 60000 रुपये गुंतवून हजार रुपये प्रति पेटी या दराने 30 मधमाशांच्या पेट्या विकत घेतल्या

व कुठल्याही ट्रेनिंग शिवाय इतर शेतकऱ्यांकडून जे काही त्यांनी शिकले आणि स्वतःचा अनुभव या जोरावर या व्यवसायाला चांगल्या प्रकारे सुरुवात केली. सुरुवातीला काही वेळा अपयश देखील आले व त्यामध्ये खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना केले ट्रेन
2016 मध्ये त्यांनी मधाचा प्रोसेसिंग युनिट देखील सुरू केला व या युनिटमध्ये ते साबण तसेच परागकण, मेणबत्ती आणि रॉयल जेली सारखे उत्पादने तयार करू लागले. स्वतःचा त्यांनी नेचर फ्रेश आणि बी बझ हे ब्रँड विकसित केले व त्या ब्रँड अंतर्गत उत्पादन विकायला सुरुवात केली.

मागच्या वर्षीचा विचार केला तर त्यांच्या या कंपनीचा महसूल दोन कोटी रुपये होता. जगपाल सिंग हे स्वतःचा व्यवसाय तर वाढवत आहेतच परंतु इतर शेतकऱ्यांना देखील मदत करत असून आतापर्यंत साधारणपणे 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले आहे.

Ajay Patil