अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे चांगला संघ बनवण्यासाठी मेगा लिलावात ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या मोसमात आयपीएल लिलावांबाबत धोनी विस्तृतपणे बोलला होता आणि सीएसकेला किमान पुढील ५-१० वर्षे खेळणारा संघ बनवण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले होते.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल मध्ये ४ वेळा विजेतेपद पटकाविले असून, आयपीएल २०२२ मध्ये सीएसके साठी हे दहा खेळाडू कोण असू शकतात, ते जाणून घेऊया.
श्रेयस अय्यर- श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये ८७ सामन्यात २३७५ धावा केल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतक आहेत. मधल्याफळीत तो चांगली फलंदाजी करु शकतो. कर्णधारपदी धोनीचा उत्तराधिकारी म्हणून श्रेयस अय्यरकडे पाहता येईल.
सुरेश रैना- सुरेश रैनाने सुरुवातीपासूनच सीएसके साठी दमदार प्रदर्शन केलं आहे. त्याने १७६ मॅचेसमध्ये ४६८७ धावा केल्या आहेत. रैना सुद्धा करीयरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पण सीएसके त्याच्या कामगिरीचा विचार करु शकते.
क्विंटन डिकॉक- दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे ७७ सामन्यांचा अनुभव असून त्याने २२५६ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि १६ अर्धशतक आहेत. सीएसकेकडे ऋतुराज गायकवाडच्या रुपाने एक सलामीचा पर्याय उपलब्ध आहे.
रायटी-लेफ्टी कॉम्बिनेशनचा विचार करता, डिकॉक उत्तम पर्याय ठरु शकतो. डिकॉक फलंदाज असण्याबरोबरच उत्तम विकेटकिपरही आहे. त्यामुळे भविष्यात तो विकेटकिपर म्हणून धोनीची जागा घेऊ शकतो.
रॉबिन उथाप्पा- रॉबिन उथाप्पाने मागच्या मोसमात सर्वांनाच धक्का दिला. त्याने प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि अंतिम फेरीत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध जबरदस्त खेळ दाखवला. सीएसकेच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. ३६ वर्षाच्या उथाप्पाने ४४ चेंडूत ६३ आणि १५ चेंडूत ३१ धावा केल्या. तो वेळेला विकेटकिपिंगही करु शकतो.
नितीश राणा- नितीश राणाने आयपीएलच्या ७७ मॅचेसमध्ये १८२० धावा केल्या आहेत. यात १३ अर्धशतक आहेत. त्याने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. पार्ट टाइम ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि मोठे फटके खेळण्यायी त्याची क्षमता आहे.
हर्षल पटेल- मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये हर्षल पटेलने सर्वाधिक 32 विकेट घेत पर्पल कॅप मिळवली होती.
दीपक चहर- दीपक चहरने नव्या चेंडूने बॉलिंग करताना गोलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पावरप्लेमध्ये विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे. मागच्या सीजनमध्ये तो सीएसके कडून खेळला होता. या सीजनमध्येही त्याला आपल्या चमूत घेण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल.
बॅटनेही तो कमाल करु शकतो. दीपकने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.
जेसन होल्डर- जेसन होल्डरने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने हॅट्ट्रीक घेतली. त्याने मालिकेत १५ विकेट घेतल्यामुळे मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. सीएसकेकडून तो खेळला आहे.
ट्रेंट बोल्ट- ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाज आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट खेळला आहे. चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे तो पावरप्लेमध्ये जास्त घातक आहे. त्याने ६२ आयपीएल सामन्यांमध्ये ७६ विकेट घेतल्या आहेत.