5 वर्षात 800 टक्के रिटर्न ! आता ‘ही’ डिफेन्स कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट आताच नोट करा

सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडेंड म्हणजे लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.

Published on -

Dividend Stock : सरकारी संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडेंड म्हणजे लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.

दरम्यान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने सुद्धा २०२५ या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे उत्तम निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं प्रथमच अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

यामुळे या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले असून सध्या या कंपनीच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर २५ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१८ फेब्रुवारी ही लाभांशासाठी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे, म्हणजे ही कंपनी उद्या एक्स-डिव्हिडेंड ट्रेड करणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान आता आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HAL चे तिमाही निकाल कसे आहेत?

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या डिसेंबर तिमाहीतील कामगिरीकडे पाहिल्यास, कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १४% ने वाढून १४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा १२६१ कोटी रुपये इतका होता.

कंपनीच्या या मजबूत कामगिरीचं प्रमुख कारण म्हणजे संरक्षण मंत्रालयाकडून सातत्यानं होत असलेल्या लढाऊ विमानांच्या ऑर्डर्स. दुसरीकडे कंपनीचा EBITDA १७% वाढून १६८३ कोटी रुपये झाला आहे. तसेच, कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन २४.२% वर पोहोचलं आहे, जे संरक्षण क्षेत्रातील स्थिर वाढ दर्शवते.

१२ सुखोई लढाऊ विमानांसाठी १३,५०० कोटींची ऑर्डर

डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला भारत सरकारकडून १२ सुखोई लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी १३,५०० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली होती. या नवीन ऑर्डरमुळे कंपनीच्या उत्पादन क्षमतेत आणि महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे.

HAL मध्ये सरकारचा ७०% पेक्षा अधिक हिस्सा

डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार, HAL मध्ये सरकारचा ७०% हून अधिक हिस्सा आहे. ही गोष्ट कंपनीच्या स्थिरतेसाठी आणि भविष्यातील विस्तारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती

HAL चा शेअर उद्या एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करणार आहे, त्यामुळे लाभांशाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी १८ फेब्रुवारीपूर्वी आपली गुंतवणूक निश्चित करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe