स्पेशल

Diwali Shopping : दिवाळीत खरेदी करायचीय ? थांबा जाणून घ्या शुभ मुहूर्त ! वाचा मुहूर्तानुसार कोणत्या तारखेला काय खरेदी करावे?

Published by
Ajay Patil

Diwali Shopping :- दिवाळी हा भारतीय परंपरेतील सगळ्यात मोठा सण असून भारतामध्ये मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या सणांमध्ये मुहूर्त पाहून अनेक गोष्टींची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते व ही खरेदी करत असताना प्रत्येक जण मुहूर्त बघत असतो.

यावर्षीच्या दिवाळीचा विचार केला तर सात ते 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या पर्यंत दररोज शुभ योग असतील. यामध्ये धनत्रयोदशीच्या दोन दिवस अगोदर शुभ मुहूर्त आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी चार राजयोग आणि एक शुभयोग तयार होत असून 10 नोव्हेंबरला पाच योगांचा महान योगायोग देखील होणार आहे.

ज्योतिषांचे याबाबतचे मत पाहिले तर त्यांच्या मते या सर्व शुभ योगांमध्ये केलेली खरेदी कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही फार जास्त कालावधी करिता फायद्याचे ठरणार आहे. या योगांमध्ये जर तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात केली तर यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.

सात ते बारा नोव्हेंबर या दिवशी तारखेनुरूप काय खरेदी करावे?

1- 7 नोव्हेंबर वार मंगळवार- या दिवशी ब्रह्म आणि शुभकार्तरी योग आहे. या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे शुभ राहील तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर हा दिवस महत्त्वाचा असेल.

2- 8 नोव्हेंबर वार बुधवार- या दिवशी इंद्र, दामिनी आणि स्थिर योग असून या दिवशी दागिने, कपडे आणि स्टेशनरी खरेदी करणे अतिशय शुभ राहील. तसेच कुणाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा दिवस खास राहील व व्यवसाय वाढवण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा असेल.

3- 9 नोव्हेंबर वार गुरुवार- या दिवशी शुभकार्तरी आणि उभयचारी योग आहे. या दिवशी फर्निचर, यंत्रसामग्री आणि वाहन खरेदी करिता हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी दोन राजयोग तयार होत असून या योगांमुळे नवीन काम सुरू करण्यासाठी देखील हा दिवसाच्या महत्त्व अनन्यसाधारण राहील.

4- 10 नोव्हेंबर वार शुक्रवार- या दिवशी शुभकार्तरी, ज्येष्ठ, सरल, सुमुख आणि अमृत योग आहे. या दिवशी धनत्रयोदशी असल्यामुळे दागिने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सर्व प्रकारची खरेदी करता येणार आहे. वाहन खरेदी करिता हा दिवस विशेष ठरताना दिसून येत आहे. या दिवशी पाच शुभ योग तयार झाल्यामुळे नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस महत्त्वाचा असेल.

5- 11 नोव्हेंबर वार शनिवार- या दिवशी प्रीती आणि सर्वार्थसिद्धी हे योग असून या योगामध्ये कुठलेही केलेले कार्य यशस्वी मानले जाते. यामुळे तुम्हाला जर वाहन आणि यंत्रसामग्री खरेदी करायची असेल किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर हा दिवस खूप चांगला आहे. यादिवशी कुठल्याही प्रकारची खरेदी करता येते.

6- 12 नोव्हेंबर वार रविवार- या दिवशी आयुष्यमान आणि सौभाग्य योग आहे. हा दिवस लक्ष्मीपूजनाचा असल्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची खरेदी, गुंतवणूक किंवा नवीन सुरुवात आणि व्यवहार खूप शुभ राहील. या दिवशी शुभ योग तयार होत असल्यामुळे सोने, चांदी आणि भांडी तुम्ही खरेदी करू शकता.

 

Ajay Patil