स्पेशल

Diwali Whatsapp Status In Marathi : तुमच्या मित्रांना पाठवा दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Diwali Whatsapp Status In Marathi :- मित्रांनो नमस्कार यंदाच्या वर्षातील सर्वात महत्वाच्या अश्या दिवाळी सणाला सुरवात झालीय आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत खास खास दिवाळी शुभेच्छा

ह्या तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram, Telegram च्या माध्यमातून तुम्ही मित्रांना शुभेच्छा देऊ शकता.

दिवाळी निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी या शुभेच्छांचा तुम्ही अवश्य वापर करा

(1)

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

(2)

लक्ष्मी आली सोनपावलांनी,
उधळण झाली सौख्याची,
धर-धान्यांच्या राशी भरल्या,
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

(3)

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

(4)

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.

(5)

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
हॅपी दिवाळी.

(6)

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळु दे,
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख समृद्धीने भरू दे!

(7)

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

(8)

आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल
आत्म जाणिवेची ज्योत लावून
आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

(9)

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(10)

फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा चकली, लाडू करंजीची ही
लज्जत न्यारी…
नव्या नवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी…!
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

(11)

बालपणाच्या गोड आठवणींनी भरलेला
उत्सव, फटाक्यांनी भरलेले आकाश
मिठाईंनी भरलेले तोंड, दिव्यांनी भरलेले घर,
आणि ह्दयात आनंद…
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!!

(11)

धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली

(12)

दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

(13)

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… शुभ दिपावली

(14)

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(15)

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

(16)

दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…

(17)

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार

(18)

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!

(19)

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!

(20)

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali

(21)

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

(22)

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(23)
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

(24)
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

(25)

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

(26)

उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

(27)

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.

(28)

दिपावलीच्या शुभ क्षणांनी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!

(28)

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

(30)

  • नवा दिवस……….नवे वर्ष……….नवी आशा………….नवा हर्ष……..

    नवे विचार……………नवी कल्पना………….

    नवा पाऊस………..नवी चेतना……….

    मनपासून हे एक इच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24