स्पेशल

फ्लिपकार्ट सोबत व्यवसाय करा आणि महिन्याला लाखो कमवा! जाणून घ्या व्यवसायाची ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Flipkart Delivery Franchise:- आपल्याला माहित आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ही कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता विविध प्रकारच्या मालाची डिलिव्हरी वेगात आणि वेळेत पूर्ण केली जाते.

सध्या जर आपण भारतातील ई-कॉमर्स मार्केट पाहिले तर ते खूप वेगाने वाढताना दिसून येत आहे व यामागील जर प्रमुख कारण पहिले तर आता बरेच लोकं हे ऑनलाईन ऑर्डर करून वस्तू मागवतात व त्यामुळे या ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवसायांना खूप चांगले दिवस असून यामध्ये चांगल्या व्यावसायिक संधी देखील आहेत.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जर बघितले तर यामध्ये फ्लिपकार्ट हे देखील एक लोकप्रिय असे प्लॅटफॉर्म असून या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने ऑर्डर दिल्या जातात व त्या पूर्ण देखील केल्या जातात.

अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही फ्लिपकार्ट सोबत फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाइजी घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय सेटअप केला तर तुम्ही या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतात.

तुम्ही फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाइजी घेतल्यानंतर तुम्हाला ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचवण्याचे काम तुम्हाला करावे लागते. त्यामुळे तुम्ही देखील एखाद्या चांगल्या व्यवसायाच्या शोधात असाल तर फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी मॉडेल हे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते

 फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजी म्हणजे नेमके काय?

फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रॅंचायजी मॉडेल्स बघितले तर याचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. यामध्ये तुम्हाला ग्राहकाच्या माध्यमातून ऑर्डर करण्यात आलेला माल ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवावा लागतो.

ही फ्रॅंचाईजी डोर स्टेप डिलिव्हरी, पिकप स्टोर किंवा फ्लिपकार्ट पिकप पॉईंटच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकतात. फ्लिपकार्ट मॉडेलमुळे तुम्हाला फ्लिपकार्टचे एक मोठे नाव मिळते आणि तुम्ही सहज चांगल्या पद्धतीने या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय विकसित करू शकतात.

 फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजीसाठी आवश्यक पात्रता

1- तुम्हाला जर हे काम करायचे असेल तर तुम्हाला आधीच लॉजिस्टिकचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही पहिल्यांदा लॉजिस्टिक कंपनीत काही काळ काम करून अनुभव मिळवू शकतात.

2- फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रॅंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला सुरक्षा शुल्क जमा करावे लागते.

3- फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्हाला 24×7 ग्राहक सेवा द्यावी लागते व तुम्हाला ग्राहकांना सेवा देण्यासाठी 24 तास उपलब्ध असणे गरजेचे असते.

4- फ्लिपकार्ट हा एक मोठा ब्रँड असल्यामुळे तुम्हाला या ब्रँडशी एकनिष्ठ राहून तुमचा व्यवसाय पुढे न्यावा लागतो.

5- फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजी करिता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे व त्यासोबतच पाचशे ते दीड हजार स्क्वेअर फुट जागा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही ही फ्रॅंचाईजी उघडू शकतात.

 फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी साठी किती खर्च येतो?

तुम्हाला जर फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजी घ्यायचे असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची फ्रॅंचाईजी घेत आहात त्यानुसार लागणारा खर्च बदलू शकतो. साधारणपणे फ्लिपकार्ट फ्रेंचायजी घेण्यासाठी 50000 पासून ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

तसेच तुम्हाला यामध्ये पाच हजार रुपयांचे सुरक्षा शुल्क म्हणजेच डिपॉझिट जमा करावे लागते. या व्यवसायामध्ये लहान पातळीपासून तर मोठ्या पातळीपर्यंत शुल्क हे जास्तीत जास्त पाच लाख रुपये पर्यंत जाऊ शकते.

या व्यतिरिक्त ऑफिस सेटअप करण्यासाठी तुम्हाला आवश्यक ते फर्निचर तसेच डिलिव्हरी साठी पिकअप आणि काही बाईक घेणे महत्त्वाचे ठरेल. तसेच पाच ते दहा कर्मचाऱ्यांचा स्टाफ तुमच्याकडे असावा. जेणेकरून तुम्ही ग्राहकांना वेळेवर वस्तू पोहोचवू शकाल.

 फ्लिपकार्ट डिलिव्हरी

फ्रॅंचायजी मधून किती पैसे मिळवता येतात?

ही फ्रॅंचायजी घेऊन तुम्ही तुमच्या स्थानानुसार वार्षिक पाच लाख ते पंधरा लाख रुपयांची कमाई करू शकतात.

 फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी घेण्यासाठी अर्ज कसा कराल?

फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रॅंचाईजीसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला तुमच्या शहराच्या प्रादेशिक ई-कार्ट समर्थन टीमशी संपर्क साधावा लागेल किंवा फ्लिपकार्टच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि माहिती दिली जाते व तुमच्या सोबत करार केला जातो. साधारणपणे या व्यवसायासाठी फ्लिपकार्ट चार वर्षांसाठी करार करतो.

Ajay Patil