स्पेशल

खोबरेल तेल निर्मितीचा ‘अशा’ पद्धतीने करा व्यवसाय, लाखो रुपये कमवाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : सध्या स्टार्टअपचा जमाना आहे. अनेक लोक नवनवीन बिझनेस करत आहेत. नोकरीमध्ये आपण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे अनेक लोक बिझनेसकडे वळले आहेत. सरकार देखील अनेक योजनेंतर्गत अनुदान देते.

तुम्हालाही मोठ्या स्वरूपातला व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला युनिक बिझनेस आयडिया देणार आहोत. हा बिझनेस आहे नारळाच्या तेलाचा. हा व्यवसाय असा व्यवसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

तुम्ही खोबरेल तेलाच्या व्यवसायातून भरपूर पैसे कमवू शकता. नारळाच्या तेलाचा वापर अन्नापासून तर औषधांपर्यंत अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. त्यामुळे याची डिमांड वाढत चालली आहे.

कसा सुरु करता येईल हा बिझनेस ?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची तयारी करावी लागेल. यासाठी काही मशिन्स व काही कच्चा माल लागेल. या व्यवसायासाठी तुम्हाला फिल्टर मशीन, स्टोरेज टँक, वुड प्रेस मशीन, एचपी मोटर आदींची आवश्यकता लागेल.

खोबरेल तेल बनवण्यासाठी वूड प्रेस मशिनमध्ये खोबरं टाकून ते चांगले कुटून घ्यावे लागेल. यानंतर ते कुस्करून तेल काढले जाते. यानंतर त्याला कोल्ड प्रेसमध्ये ठेवले जाते. ते थंड झाल्यावर फिल्टर मशीनच्या साहाय्याने ते शुद्ध करून घेतले जाते.

या व्यवसायासाठी तुम्हाला चांगले मार्केट शोधावे लागेल. लोकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहोचवण्यासाठी जाहिरात करावी लागेल. जेणेकरून तुमची डिमांड वाढेल व व्यवसायही वाढत जाईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला बरेच भांडवल लागेल.

कच्चा माल असेल, मशीन असतील, जागेसाठी, वाहतुकीसाठी तुम्हाला सुरवातीला खर्च करावे लागेल. साधारण याला 15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत भांडवल अपेक्षित आहे. यासाठी तुम्ही कर्जही घेऊ शकता.

यातून तुम्ही किती नफा कमावू शकता

हा व्यवसाय वर्षभर चालणारा बिझनेस आहे. हा कधीही बंद पडणारा व्यवसाय नाही. यात वन टाइम इनव्हेसमेंट करावी लागेल. तुमचा खर्च वजा जात तुम्ही वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवू शकता. जसजसा तुमचा व्यवसाय वाढेल तशी तुमची गुंतवणूक वाढेल, परंतु तुमचा नफाही त्याच तुलनेत वाढत जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office