स्पेशल

तुम्हीही घर भाड्याने दिलेय का? मग पोलिसांनी केलेल ‘हे’ आवाहन पूर्ण करा अन्यथा खाल जेलची हवा

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : आजकाल वाढती लोकसंख्या व रोजगारानिमित्त लोक इतर शहरात राहतात. त्यामुळे हे लोक सर्रास खोली भाड्याने घेऊन राहतात. सध्या भाड्याने खोल्या देणे, घर देणे हे कॉमन झाले आहे.

परंतु घरमालकांना काही नियम माहिती असणे आवश्यक आहे. कारण तुम्ही खोली भाड्याने देता तेव्हा त्याचे बॅकराउंड किंवा इतर काही माहिती नसते. त्यामुळे घरमालकाने भाडेकरूंची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करणे गरजेचे आहे.

वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हे करणे अत्यंत गरजेचे आहे. मोठ्या शहरात भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असूनही घरमालक माहिती देत नाहीत असे चित्र आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

भाडेकरार करा व त्याची एक प्रत पोलिसांत द्या

जर तुमच्या घरात भाडेकरू राहत असेल तर त्यांचा भाडेकरार करून घ्या. त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात द्या. असे केल्याने पोलिस ठाण्यात भाडेकरूंची नोंद होऊ शकेल. परंतु अनेकदा भाडेकरूंची माहिती घरमालकाकडून संबंधित पोलिसांना दिली जात नसल्याचे वास्तव आहे.

 ..तर तुमच्यावर होऊ शकतो गुन्हा दाखल

जर तुमचा भाडेकरू एखाद्या गुन्ह्यात अडकला व त्याला अटक झाली व याचा भाडेकरार नसेल व पोलिसांत माहिती नसेल तर अडचणीचं ठरू शकते. अशा केसमध्ये घरमालकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे घरमालकांनी आपले घर भाड्याने दिल्यास त्याची नोंद पोलिस ठाण्यात करणे बंधनकारक असल्याचे पोलीस सांगत आहेत.

Ahmednagarlive24 Office