स्पेशल

डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करा आणि विम्याचा लाभ घ्या! कसा मिळतो ‘या’ कार्डसोबतचा विमा? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

जेव्हा आपण बँकेमध्ये खाते उघडतो तेव्हा आपल्याला डेबिट कार्ड देण्यात येते व त्यालाच आपण एटीएम कार्ड असे देखील म्हणत असतो. तसेच आपण क्रेडिट कार्डचा देखील वापर करतो व या कार्डच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जातात.

परंतु बँकांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या सुविधा मिळत असतात व त्यातील बऱ्याच सुविधा आपल्याला माहिती नसतात.

या मिळणाऱ्या सुविधांच्या अनुषंगाने पाहिले तर आपल्याला या कार्डसोबत विमा कव्हरेज देखील मिळत असते व तो आपल्याला आर्थिक संकटाच्या मध्ये कामी येतो.

परंतु होते असे की या कार्डच्या माध्यमातून जो काही विमा संरक्षण किंवा विमा कवरेज आपल्याला मिळते त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. म्हणून आपण या लेखांमध्ये या विम्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ.

 डेबिट किंवा क्रेडिट कार्डसोबत मिळतो विमा

आपल्या आर्थिक व्यवहारांकरिता आपण दररोज डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असतो व या कार्डसोबत अनेक सुविधा देखील आपल्याला मिळत असतात. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे आपल्याला या कार्डसोबत विमा कव्हरेज देखील मिळतो व अपघाताच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत या माध्यमातून होऊ शकते.

एखाद्या वेळेस अपघात झाला आणि आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर या विम्यामुळे आपल्याला हॉस्पिटलचा खर्च मिळू शकतो. म्हणजेच आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा विमा आपल्या कामी येऊ शकतो.

कसा मिळवाल या विम्याचा लाभ?

*या कार्डसोबत मिळणाऱ्या विम्याच्या अटी आणि नियम*

1- कार्डचा वापर कालावधी या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या विमा कव्हरेजसाठी जर अपघाताची घटना घडली तर त्या घटनेच्या 90 दिवसांपूर्वी तुमच्या कार्डचा कमीत कमी एक वेळा तरी वापर केला गेला असणे गरजेचे आहे. एटीएम मधून पैसे काढणे किंवा बँकेत पैसे जमा करणे इत्यादी व्यवहार कमीत कमी एकदा तरी व्हायला पाहिजे.

 या विमा अंतर्गत दावा करण्याची मुदत

अपघात झाला तर अपघात झाल्यापासून 60 दिवसाच्या आत तुम्ही यासंबंधीचा विमा दावा करू शकतात. मात्र या कालावधीत जर दावा केला गेला नाही तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळत नाही.

 या विम्याचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

 या विम्याचा लाभ घेण्यासाठी जर मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र आणि पोलीस अहवाल(अपघाताचा)

 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यास रुग्णालयाचे बिल तसेच उपचाराचे संपूर्ण तपशीलवार माहिती असणारे कागदपत्रे आणि डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

 दावा कसा कराल?

1- बँकेशी संपर्क साधणे आपल्या बँकेमध्ये जाऊन किंवा बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून विमा दाव्याची माहिती मिळवणे गरजेचे आहे.

2- दाव्यासाठीचा फॉर्म भरणे याकरिता बँकेत जाऊन दाव्यासाठी चा फॉर्म घ्यावा व तो व्यवस्थित भरून सर्व कागदपत्र फॉर्मला जोडून तो सबमिट करावा.

3- दाव्याची स्टेटस चेक करणे फॉर्म सादर केल्यानंतर तुमच्या दाव्याची स्थिती तुम्हाला पाहत राहणे म्हणजे ट्रॅक करत राहणे गरजेचे असते. आता तुम्ही बँक किंवा विमा कंपनीशी संपर्कात राहावे

 या गोष्टी करा

आपल्याकडे असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या सुविधांची पूर्ण माहिती घेतल्याने आणि आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केल्याने आपण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य ती सोय उपलब्ध करू शकतात. त्यामुळे विमा संरक्षणाची पूर्ण माहिती आणि जागरूकता हे आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकतात. त्यामुळे याबाबतची जास्तीत जास्त माहिती घेणे गरजेचे आहे.

Ajay Patil