स्पेशल

एक दमडी न देता मुलांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे आहे का? करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

शिक्षण हे सध्या खूप महाग झाले असून उच्च शिक्षण घेणे तर आता बऱ्याच  पालकांच्या आर्थिक आवाक्यापलीकडे गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे बऱ्याच होतकरू विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते व शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून शासनाच्या माध्यमातून अनेक स्कॉलरशिप योजना राबविण्यात येतात व त्या माध्यमातून अशा होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे रखडू नये व त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हा त्यामागचा उद्देश असतो.

तसेच बऱ्याचदा उच्च शिक्षणच नाहीतर बारावीपर्यंत शिक्षण घेणेदेखील बऱ्याच विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. या सगळ्या अनुषंगाने जर आपण बारावी पर्यंत जर मोफत शिक्षण हवं असेल तर त्याकरिता जवाहर नवोदय विद्यालय मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते. या विद्यालयामध्ये शिक्षण तर उच्च दर्जाचे मिळतेच.

परंतु विद्यार्थ्यांना राहण्यापासून तर खाण्यापर्यंत सर्व काही फ्री मध्ये असतं व या विद्यालयात पाचवीपासून ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते. म्हणजेच पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाकरिता एक रुपया खर्च करण्याची गरज भासत नाही.

जवाहर नवोदय विद्यालयाचे संपूर्ण कामकाजाचे नियोजन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले जाते. विशेष म्हणजे या विद्यालयांमध्ये प्रवेशा करिता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रकर्षाने विचार केला जातो व ग्रामीण भागातील होतकरू  विद्यार्थ्यांना इथे मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळते. नवोदय मध्ये सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असतो.

 जवाहर नवोदय विद्यालयमध्ये कसा मिळतो प्रवेश?

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल तर सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांची योग्यता तपासली जाते व याकरिता विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत एक परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेला जेएनव्हीएसटी असे म्हणतात. या परीक्षेचे स्वरूप पाहिले तर यामध्ये विद्यार्थ्यांची बहुतेक क्षमता आणि त्यांचे क्षत्रिय ज्ञान कसे आहे यावर सगळे अवलंबून असते.

या परीक्षेमध्ये जे मुले उज्वल यश मिळवतात त्यांना या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर नवोदय मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी शुल्क भरण्याची किंवा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसून तुमचे पाल्य जर हुशार असेल तर त्याला आरामात प्रवेश मिळतो.

ग्रामीण भागातील 75 तर शहरी भागातील 25% जागा अशाप्रकारे हे नियोजन केलेले आहे. विद्यार्थी पाचवी पर्यंत शिकलेले असतात अशा मुलांना जेएनव्हीएसटी परीक्षा देता येते.

यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सहावी ते बारावी पर्यंत असे सात वर्ष नवोदय विद्यालयामध्ये मुलांना शिकता येते. एवढेच नाहीतर सरकारी शाळेमध्ये तिसरी तसेच चौथी आणि पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील नवोदय विद्यालयात एडमिशन मिळते.

 या विद्यालयात काय मिळते फ्री?

नवोदय विद्यालयामध्ये एक रुपया देखील तुम्हाला खर्च करण्याची गरज भासत नाही. मुलांच्या राहण्यापासून तर खाणे पिणे, वह्या तसेच पुस्तके व बॅग देखील मोफत दिले जाते. इतकेच नाहीतर मुलांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या देखील मोफत मिळतात.

जसं की मुलांना लागणारा साबण तसेच त्यांना लागणारे तेल व टूथ ब्रश, कपडे तसे इस्त्री, शूज आणि मुलींसाठी सॅनिटरी पॅड सुद्धा मोफत मिळतात. एवढेच नाही तर या विद्यालयात शिकणाऱ्या मुलांचा वैद्यकीय खर्च तसेच बसची फी व सीबीएससी बोर्डाची फी सुद्धा माफ असते.

 कसा कराल अर्ज?

शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली असून ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांना प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024 आहे. हा फॉर्म  cbseitms.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून हा फॉर्म भरताना मुलांचा रहिवासी दाखला जोडणे गरजेचे आहे.

Ajay Patil