स्पेशल

तुम्हाला तुमची कार विकायची आहे का? त्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे ! वाचा यादी, वेळेला नाही होणार गोंधळ

Published by
Ahmednagarlive24 Office

आपल्याकडे एखादे वाहन असते व कालांतराने आपल्याला एखादे नवीन वाहन घ्यायचे असते किंवा इतर कारणाने आपल्याकडे असलेले जुने वाहन आपण विकतो. परंतु अशाप्रकारे जेव्हा आपण जुने वाहन किंवा कार विकायला जातो तेव्हा आपल्याला वाहनाशी संबंधित असलेले महत्त्वाचे कागदपत्र लागतात. कारण वाहन किंवा कार खरेदी विक्री करण्याची एक प्रक्रिया असते व ती पैशांच्या संबंधित प्रक्रिया असल्यामुळे कार घेणारा म्हणजेच कार खरेदी करणारा व्यक्ती सगळ्यात अगोदर त्या कारची कागदपत्र बरोबर किंवा पूर्ण आहेत की नाही याची खात्री अगोदर करतो.

कारण कुठल्याही वाहनाचे किंवा कारचे सर्व कागदपत्र व्यवहाराच्या दृष्टिकोनातून व कायदेशीर दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या कारची सगळी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे असते. तेव्हाच तुम्ही कुठल्याही समस्येशिवाय कारची विक्री करू शकता. त्यामुळे भारतामध्ये कार विक्री करण्यासाठी कुठली कागदपत्रांची आवश्यकता असते? याची माहिती या लेखात घेऊ.

स्वतःची कार विक्री करा परंतु त्यासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा

1) आरसी म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट – कुठल्याही वाहनाच्या बाबतीत आरसी म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे असून या कागदपत्राच्या माध्यमातून संबंधित वाहनाचे मालकी हक्क व त्याची नोंदणी समजते. त्याकरिता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे.

2) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट – तुम्ही तुमची कार जेव्हा विकत आहात तेव्हा त्यावर कुठलं कर्ज आहे की नाही वा काही कर्ज बाकी आहे का याबद्दलचा पुरावा म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अर्थात एनओसी आहे.

3) ओनरशिप 29 फॉर्म ट्रान्सफर करणे – जेव्हा कार किंवा इतर वाहनाच्या व्यवहाराच्या वेळेस संपूर्ण रक्कम मिळते तेव्हा वाहनाचा मालकी हक्क ट्रान्सफर करावा लागतो व याकरिता ओनरशिप 29 हा फॉर्म विक्रेत्याकडून खरेदी दाराकडे संबंधित वाहनाची मालकी हस्तांतरित करत असतो.

4) पीयूसी सर्टिफिकेट – एखाद्या वाहनाच्या माध्यमातून जर प्रदूषण होण्याची शक्यता असेल तर अशा वाहनाच्या मालकाला ते वाहन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जात असतो व त्याकरिता पीयूसी सर्टिफिकेट वाहनासाठी काढणे गरजेचे असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही कार विक्री करायला जाता तेव्हा तुमच्या कारचे पियुसी सर्टिफिकेट वैध आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

5) कारचे इन्शुरन्स सर्टिफिकेट – आपल्याकडील वाहनाचा विमा काढणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कार विकता तेव्हा त्या कारचा विमा आहे की नाही याचा पुरावा देण्यासाठी कारचे इन्शुरन्स सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे.

6) पत्त्याचा पुरावा – कार किंवा कुठलीही वाहन विक्री करताना पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित कारच्या विक्रेत्याला त्याचे आधार कार्ड, पासपोर्टची प्रत देखील सादर करावे लागते.

7) आयडेंटी म्हणजेच ओळखीचा पुरावा – विक्रेत्याला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत देखील सादर करणे गरजेचे असते.

8) फॉर्म 30 – कारची मालकी हस्तांतरणासाठी आरटीओकडे अर्ज करणे गरजेचे असते व यासाठी फॉर्म 30 आवश्यक असतो.

9) प्रतिज्ञापत्र – वाहनाबद्दलची इतर महत्त्वाची माहिती जसे की वाहनाची स्थिती तसेच कर्ज इत्यादीबद्दलचे महत्त्वाची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र विक्रेत्याकडून घेणे गरजेचे असते.

10) आरटीओ इंडोर्समेंट – कार खरेदी केल्यानंतर आरटीओच्या माध्यमातून आरसी आणि फॉर्म 29 वर इंडोर्समेंट मिळवणे खूप गरजेचे असते व ते मिळवावे.
ह्या गोष्टींवर लक्ष द्या

वाहनाची विक्री करण्यापूर्वी सर्व कर किंवा दंड भरले आहे की नाही याची देखील खात्री करून घ्यावी. तसेच ज्या कंपनीच्या माध्यमातून कारचा विमा घेतला असेल त्या कंपनीला त्या कारच्या मालकी हस्तांतरणाची सूचना द्यावी. तसेच संबंधित कारचे मॅन्युअल्स आणि इतर ॲक्सेसरीज खरेदीदाराकडे द्याव्यात.

Ahmednagarlive24 Office