स्पेशल

स्वतःच्या नावावर सातबारा उतारा नाही परंतु शेत जमीन विकत घ्यायची आहे? तर काय आहे त्यासाठीची कायदेशीर पद्धत?

Published by
Ahmednagarlive24 Office

भारतामध्ये संपत्ती तसेच शेतजमिनीच्या विषयी अनेक प्रकारचे कायदे असून ते पाळणे सर्वांसाठी खूप गरजेचे आहे. आपण जमिनीच्या बाबतीत बघितले तर शेत जमिनीची मालकी ही सातबारा उतारा च्या माध्यमातून सिद्ध होत असते. कारण ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा उतारा असतो त्या व्यक्तीच्या नावावर जमिनीचा काही तुकडा तरी असतोच असतो.

परंतु या सातबारा उताराच्या विषयी जर आपण एक कायदा बघितला तर तो खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र मध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा उतारा आहे त्याच व्यक्तीला शेतजमीन खरेदी करता येते असा देखील एक नियम आहे.

त्यामुळे आता ज्या लोकांच्या नावावर सातबारा उतारा नाही अशा लोकांना जर जमीन खरेदी करायची असेल तर खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. कारण बऱ्याच लोकांकडे शेती नसते, परंतु त्यांना शेती करण्याची आवड असल्यामुळे त्यांना शेत जमीन विकत घ्यायचे असते.

परंतु सातबारा उतारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शेतजमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या लेखात आपण बघू की ज्या लोकांच्या नावावर सातबारा उताराच नाही त्यांना शेत जमीन खरेदी करायची आहे तर त्यांना कशा पद्धतीने करता येईल?

स्वतःच्या नावावर सातबारा उतारा नाही परंतु शेत जमीन कशी खरेदी कराल?

1- आधीच्या पिढीने विकलेली जमिनीची विक्री प्रत पुरावा म्हणून देणे- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेत जमिनीवर शेतकऱ्यांचा अधिकार असावा या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला आहे. राज्यामध्ये अशी अनेक कुटुंब आपल्याला दिसून येतात की त्यांच्याकडे अगोदर शेती होती परंतु त्यांच्या अगोदरचे पिढीने ती विकली आहे.

परंतु आत्ताच्या पिढीला शेतजमीन नसल्यामुळे दुसरी शेत जमीन देखील त्यामुळे खरेदी करता येत नाही. अशावेळी तुमच्या नावावर सातबारा उतारा नाही आणि तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची आहे तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या आधीच्या पिढ्यांनी वडिलोपार्जित जमीन विक्री केली असेल तर ती नेमकी कोणाला विकली आहे याची माहिती करून तुम्ही त्या विक्री पत्राचे कॉफी देऊन तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा देऊ शकतात.

संबंधित अगोदर झालेल्या जमिनीच्या व्यवहाराच्या विक्री पत्रावर तुमच्या वडिलोपार्जित शेतीचा जुना सातबाराचा क्रमांक मिळतो व त्या क्रमांकावरून तुम्ही त्यावरच्या सगळ्या नोंदींची कॉपी देखील मिळवू शकतात व तुम्ही वंशपरंपरेने शेतकरी आहात हे सिद्ध देखील करू शकतात. त्या पद्धतीने तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बनवून घेऊ शकतात व शेतजमीन खरेदी करू शकता.

2- नातेवाईकांच्या नावावर नाव लावणे- या पर्यायांमध्ये तुम्ही तुमचे काका तसेच चुलत काका, तुमच्या आईचे वडील अशा नातेवाईकांची मदत घेऊ शकतात. समजा उल्लेख केलेला या नातेवाईकांकडे जर जमीन असेल तर त्या जमिनीच्या उताऱ्यावर तुमचे नाव लावून घेणे हा एक पर्याय आहे.

म्हणजे असं नाव फक्त तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात लावू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा जमीन खरेदीचा मार्ग मोकळा होतो. तुमचे जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना हक्कसोड पत्र देऊ शकतात. विशेष म्हणजे ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात देखील नाही. कारण ज्या व्यक्तीला वारस म्हणून शेती मिळते तो आपोआप शेतकरीच होत असतो.

Ahmednagarlive24 Office