Dr Panjabrao Krishi Vidyapeeth recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हणजे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून कृषी विद्यापीठात वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत.
तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कोणत्या पदांसाठी अन किती रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि यासाठी अर्ज कसा सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग ‘इतके’ दिवस रजा घेतली तर त्यांची सेवा समाप्ती होणार ! पहा सेवासमाप्तीचा नियम
कोणत्या आणि किती पदांसाठी आहे भरती?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंजाबराव कृषी विद्यापीठअंतर्गत नुकत्याच काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सहाय्यक (Assistant) 01 जागा, स्टेनोग्राफर (Stenographer) 03 जागा, ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (Driver-cum-Mechanic) 03 जागा, प्रोग्राम असिस्टंट संगणक (Programme Assistant Computer) 03 जागा, प्रोग्राम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) (Programme Assistant (Lab Technician) 03 जागा, फार्म मॅनेजर (Farm Manager) 03 जागा अशा एकूण 16 रिक्त जागा या संबंधित पदांच्या भरल्या जाणार आहेत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग; राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
अर्ज कसा केला जाऊ शकतो?
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी ईच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज करता येणार आहे. तरीही उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये अर्ज भरणे गरजेचे आहे. विहित कालावधी उलटून गेल्यानंतर भरण्यात आलेल्या अर्जावर या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, या पदभरतीसंदर्भात जसें की, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन इत्यादी गोष्टीची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी एकदा काळजीपूर्वक अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. अधिसूचना पाहण्यासाठी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ भरती 2023 या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड, पहा संपूर्ण जाहिरात