Share Market Tips : काल अर्थातच 23 जुलै 2024 ला केंद्रातील सरकारने 2024 25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प संसदेत मांडला आहे. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर हा पहिलाच पूर्ण बजेट होता. यामुळे या बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. यामध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा होणार अशी अपेक्षा होती. यानुसार सरकारने या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाजातील विविध प्रवर्गासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.
दरम्यान या बजेटचा प्रभाव म्हणून शेअर मार्केट मधील एक स्टॉक वायु वेगाने वधारला आहे. या स्टॉकच्या किमती अवघ्या काही तासातच आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत पीएम सूर्योदय योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत सरकार सौरऊर्जेने एक कोटी घरे उजळवणार आहे.
या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या अंतर्गत सोलर पॅनल बसवणाऱ्या लाभार्थ्यांना तब्बल 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर तीस हजार, दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर 60,000 आणि 3 किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर 78,000 असे अनुदान वितरित केले जाणार आहे.
खरे तर ही योजना निवडणुकीआधीच सुरू करण्यात आली आहे. यासाठी आधीच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान आता या योजनेचा अर्थसंकल्पात पुन्हा एकदा उल्लेख झाला आहे. यामुळे काही सोलर कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. बोरोसिल रेन्यूवेबल्स हा देखील असाच एक शेअर आहे. अर्थसंकल्पानंतर या स्टॉकच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. काल बीएसईमध्ये अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या कंपनीचे शेअर्स 487.95 रुपयांच्या पातळीवर उघडले होते, परंतु काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सने 11 टक्क्यांहून अधिक वाढीसह 534.30 रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.
यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. आता आपण या स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर टाकून घेऊया. या स्टॉकच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि एका महिन्यात शेअरच्या किमतीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. BSE मध्ये कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 667.40 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 391.55 रुपये आहे.