पावसाळ्यामध्ये पर्यटकांना साद घालतात कोकणातील ‘हे’ निसर्गरम्य धबधबे! द्याल भेट तर बघायला मिळेल निसर्गाचा सुंदर आविष्कार

Pragati
Published:
कोकणातील धबधबे

महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला लाभलेली विस्तीर्ण समुद्र किनारपट्टी आणि त्या ठिकाणी असलेल्या आंबा, नारळ तसेच काजू व बहरलेल्या फणसाच्या बागा पाहण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो. खासकरून कोकणामध्ये तुम्ही कुठल्याही ऋतूत गेला तरी तुम्हाला निसर्गाचा आनंद अगदी जवळून अनुभवता येतो व आयुष्यामध्ये निसर्गाचे महत्त्व अधोरेखित होते. पावसाळ्यामध्ये तर कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरते आणि अनेकांना भुरळ घालते. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षातील आणि जगातील पर्यटक पावसाळ्यामध्ये कोकणाला भेट देतात. पावसाळ्यामध्ये कोकणात अनेक ठिकाणी धबधबे वाहाययला लागतात व त्यांचे ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होते व तुम्हाला देखील निसर्गाने नटलेले धबधबे या पावसाळ्यामध्ये बघायचे असतील तर कोकण सारखा दुसरा पर्याय नाही.

कोकणातील हे धबधबे आहेत निसर्गाचा सुंदर आविष्कार

1) सवतसडा धबधबा –

जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण परशुराम घाटातील रस्त्याच्या अंतर्गत घळईत घाट चढतो तेव्हा उजव्या बाजूला सवतसडा धबधबा आपल्याला दिसून येतो. पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे मनमोहक रूप मनाला मोहून टाकते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचा परिसर अवघ्या हिरवाईने नटलेला असतो. चिपळूण शहरापासून चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून उंचावरून कोसळणारे धबधब्याचे पाणी पाहण्यात व त्या पाण्यामुळे खाली डोहासारखा खड्डा तयार झाला असून त्या ठिकाणी पोहण्यात किंवा भिजण्यात खूप मजा येते.

2) सवतकडा धबधबा –

हा धबधबा देखील निसर्गाच्या कुशीत असून या धबधब्याच्या चारही बाजूंनी डोंगररांगा आहेत. सवतकडा धबधबा राजापूर तालुक्यात चुनाकोळवण या ठिकाणी आहे. जेव्हा तुम्ही मुंबई ते गोवा या महामार्गावर राजापूर कडून मुंबईकडे जातात तेव्हा 12:30 किलोमीटरवर डाव्या बाजूला शिवणे हा रस्ता जातो व त्या ठिकाणाहून साडेसहा किलोमीटरवर साधारणपणे चुनाकोळवण हे गाव आहे. या ठिकाणी तुम्ही गाडी लावून गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पाहायला जाऊ शकतात. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर डोंगरदर्‍यांचा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अनेक छोटे मोठे धबधबे देखील पाहायला मिळतात.

3) आंबोली धबधबा –

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणच्या धबधब्यांचा देखावा पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे आंबोली घाटातील धबधबे पावसाळ्यात पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होते. या ठिकाणी असलेल्या अनेक उंच उंच धबधब्यांमुळे या ठिकाणचे पर्यटन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बहरून जाते. आता या ठिकाणी पर्यटकांसाठी काही नियम घालण्यात आले असून त्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी प्रवेश ठेवण्यात आलेला आहे.

4) मारलेश्वरचा धारेश्वर धबधबा –

सह्याद्रीच्या कुशीमध्ये हिरव्यागार परिसरात नटलेल्या उंच उंच डोंगर रांगा आणि समोर धारेश्वर धबधबा असे विहंगम दृश्य तुम्हाला संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर या ठिकाणी पाहायला मिळते. हा फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होते. खासकरून मार्लेश्वर हे एक पर्यटन स्थळ असून हे ठिकाण देवरुख पासून 18 किलोमीटर तर कोल्हापूर कडून येताना आंबा घाट कळकदरा येथून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे या पर्यटन स्थळाचे अगदी पायथ्यापर्यंत तुम्ही कार नेऊ शकतात व पायथ्यापासून साडेचारशे पायऱ्या चढून वर जावे लागते. वर गेल्यावर तुम्हाला गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान पाहायला मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe