स्पेशल

घाई करा उरले फक्त दोन दिवस!… नाहीतर एक जुलैपासून नाही मिळणार मोफत रेशनचे धान्य, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

केंद्र सरकारच्या माध्यमातून दर महिन्याला देशातील जवळपास 80 कोटी नागरिकांना मोफत धान्याची सुविधा दिली जाते. आपल्याला माहित आहे की स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना या मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिले तर या मोफत धान्य योजनेमध्ये देखील धान्याचा काळाबाजार उघडकीस आल्याच्या घटना घडली.

तसेच काळा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य विकले जात असल्याचे प्रकरणे देखील सातत्याने समोर येत असतात. तसे याशिवाय अनेक गैरप्रकार देखील घडतात.त्यामुळे या सगळ्या गैर कारभाराला आळा बसावा म्हणून  सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्ड वरील नाव असलेल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना रेशन कार्डचे ई केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

महत्वाचे म्हणजे याकरिताचे शेवटची मुदत 30 जून 2024 असून ही मुदत संपण्याला अजून दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांनी या मुदतीपूर्वी ई केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. जर या पद्धतीने ई केवायसी केली नाही तर एक जुलै पासून मोफत धान्य मिळणे बंद होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी रेशन दुकानांमध्ये जाऊन मोफत ई केवायसीची प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे.

 कशी आहे केवायसीची प्रक्रिया आणि केली नाहीतर काय होईल?

ई केवायसी अपडेट करण्याकरिता रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रमुख तसेच रेशन कार्डवर कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांनी बायोमेट्रिक तपशील म्हणजेच बोटांचे ठसे यामध्ये घेतले जाणार आहेत. ही केवायसीची प्रक्रिया रेशन कार्ड दुकानदाराकडून केली जाणार आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

सध्या आपण रेशन दुकानांवर ज्या मशीनवर अंगठा ठेवून मोफत धान्याचा लाभ घेतो त्याच मशीनच्या मदतीने ही प्रक्रिया केली जाणार आहे. समजा एखाद्या कुटुंबाच्या रेशनकार्ड वर चार सदस्यांची नावे आहेत आणि त्यापैकी जर एखादा सदस्याने  बायोमेट्रिक म्हणजेच ई केवायसी केली नाही तर त्याचं नाव रेशन कार्ड वरून कमी केले जाण्याची शक्यता असून त्या सदस्याच्या वाट्याचे धान्य देखील त्या कुटुंबाला दिले जाणार नाही.

म्हणजेच एकूण कुटुंबातील सदस्यांच्या नाव असलेल्यांपैकी जितके व्यक्ती ई केवायसी अपडेट करतील तेवढ्याच व्यक्तींचे धान्य त्या कुटुंबाला मिळेल. त्यामुळे ई केवायसी अपडेट करून घेणे गरजेचे आहे व याकरिता रेशन कार्डधारकांना आधार कार्ड नंबर यासाठी आवश्यक असणार आहे. आतापर्यंत फक्त कुटुंबप्रमुखांनी जरी ई केवायसी केली तरी त्याला धान्य मिळत होते.

परंतु आता हे बंद होणार आहे. रेशन कार्डवर नाव असलेल्या सगळ्यांनाच आता त्यांच्या बोटांचे ठसे द्यावे लागणार आहेत व तरच पूर्ण सदस्यांच्या नावाचे धान्य मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुमच्या आधार कार्ड अपडेट नसेल तर ते अपडेट करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार अपडेट करून ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे व त्याची शेवटची मुदत 30 जून आहे.

Ajay Patil