Edible Oil Rate : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे बेजार झाली आहे. गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट महागाईमुळे पूर्णपणे कोलमडले आहे. महिन्याकाठी येणारा पगार हा फक्त घर खर्च भागवण्यातच निघून जात असल्याची तक्रार आता नोकरदार वर्गाकडून केली जात आहे.
या अशा वाढत्या महागाईतच सर्वसामान्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. कारण की महागाई डायन पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून ऐन सणासुदीच्या हंगामात खाद्यतेलाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

यामुळे, सर्वसामान्य गरीब जनतेला ऐन सणासुदीच्या काळात मोठा फटका बसणार आहे. खरे तर दरवर्षी सणासुदीचा हंगाम सुरू झाला की खाद्यतेलाची मागणी वाढत असते. सणासुदीच्या काळात नेहमीच खाद्यतेलाची मागणी वाढत असते.
यामुळे या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याचीही शक्यता असते. त्यानुसार यंदाही खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमती किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे खाद्यतेलाच्या किमती तर वाढलेल्या आहेतच शिवाय तेलाचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. म्हणजेच अधिकचे दर देऊनही तेल उपलब्ध होत नाहीये. यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेत सरकार विरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या बाजारातील खाद्यतेलाचे साठे फारच कमी आहेत. यामुळे तेलाचा शॉर्टेज निर्माण झाला आहे. म्हणून आता नागरिकांना तेलाच्या खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
सणासुदीत खाद्यतेल खरेदीत वाढ होत असते. अन अशातच खाद्यतेलाच्या किमतीत झालेली ही वाढ सर्वसामान्य गरीब जनतेची चिंता अधिकच वाढवणारी ठरत आहे. दरम्यान आता आपण खाद्यतेलाचे नवीन दर नेमके कसे आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खाद्यतेलाचे नवीन दर खालील प्रमाणे
सरकी- १२५ ते १३०
शेंगदाणा तेल – १८२ ते १८८
सोयाबीन तेल – ११५ ते १२०
पामतेल – ११५ ते १२०
सूर्यफूल – १२० ते १२५
अर्थातच विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये किलोमागे 15 ते 20 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात होत्या. मात्र श्रावण महिना संपला आणि तेलाच्या किमती वाढल्यात.
खरे तर श्रावण महिन्यातच काही ठिकाणी तेलाच्या किमती वाढल्या होत्या. श्रावण महिना संपल्यानंतर सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात तेलाच्या किमती आणखी वाढल्यात.
येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी सारखा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे. यामुळे आगामी काही दिवस खाद्यतेलाच्या किमती अशाच तेजीत राहण्याची शक्यता आहे.