El Nino Monsoon 2023 : सध्या भारतात एल निनो बाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. अमेरिकन हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी एल निनो मुळे भारतासह आशिया खंडात दुष्काळाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून एलनिनो बाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. काही भारतीय हवामान वर्तवणाऱ्या संस्थांनी देखील अमेरिकन हवामान विभागाच्या या अंदाजाला दुजोरा दिला आहे.
पण एल निनोला घाबरण्याचे काही कारण नसल्याचे मत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रशांत महासागरात दर तीन ते पाच वर्षांनी एलनिनो ऍक्टिव्ह होत असतो. मात्र याला लगेचच घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण की आतापर्यंत जितक्या वेळा एलनिनो सक्रिय झाला आहे त्याच्या पैकी निम्मेवेळा महाराष्ट्रासह भारतात समाधानकारक पाऊस पडला आहे.
हे पण वाचा :- 1 एप्रिलपासून काय होणार महाग काय होणार स्वस्त; आताच चेक करा यादी
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा दशकांच्या काळात आतापर्यंत जवळपास 16 वेळा एलनिनो सक्रिय झाला आहे तर यापैकी केवळ नऊ वेळा भारतात कमी पाऊस पडला आहे. म्हणजेच दुष्काळ नसून कमी पाऊस पडला असल्याचं त्यांचं मत आहे.
एकंदरीत एलनिनोमुळे भारतीय मानसून जरी प्रभावित होत असला तरी देखील त्याचा रेशो खूपच कमी आहे. आतापर्यंत जितक्या वेळा ही हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे त्यापैकी निम्म्या वेळा समाधानकारक पाऊस राहिला असल्याने निश्चितच ही एक दिलासादायक बाब आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ईस्टर्न फ्रीवे बाबत मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा याविषयी सविस्तर
यासोबतच त्यांनी भारतीय मानसून साठी एल निनो व्यतिरिक्त इतरही काही घटक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पावसासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. यातआयओडी म्हणजे इंडियन ओशियन डायपोलअर्थात भारतीय समुद्री स्थिरांक देखील अतिमहत्त्वाचा घटक आहे.
शिवाय युरेशियात जे बर्फाळ आच्छादन आहे, त्यावरही भारतीय मान्सून अवलंबून असल्याची बहुमूल्य माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. एकंदरीत एल निनो बाबत आतापासूनच घाबरण्याचे काही कारण नाही मात्र येणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून असणे अति आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केल आहे.
हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘थोडी खुशी तो थोडा गम’ देणारा निर्णय; मानधनवाढ दिली पण अटी खूपच जाचक, पहा….