Election Card News : आपल्याकडे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण मोठी प्रचलित आहे. कारण की सरकारी कामासाठी नागरिकांना कायमच त्रास सहन करावा लागतो, वेळ आणि पैसा वाया घालवावा लागतो.
यात सर्वाधिक पिळवणूक होते ती सरकारी कागदपत्रे काढताना. शासकीय कार्यालयातुन कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी देखील सामान्य नागरिकांना कायमच सरकारी छळाला तोंड द्यावे लागले आहे.
मात्र आता मतदार यादीत नाव नोंदणी सोप होणार आहे. असं म्हणण्यापेक्षा आता मतदार यादीत नाव नोंदण्याची सामान्य नागरिकांना गरजच उरणार नाही.
हे पण वाचा :- स्टॉक असावा तर असा ! ‘या’ स्टॉकनें 3 वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना दिला करोडोचा परतावा, वाचा…
हो, अगदी बरोबर! आता मतदार यादीत सामान्य नागरिकांनी नाव नोंदलं नाही तरी देखील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीचे मतदार यादीत ऑटोमॅटिक नाव ॲड होणार आहे. यासाठी लवकरच यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
विशेष म्हणजे याबाबतचे विधेयक लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. यासंदर्भात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली आहे.
मंत्री महोदय यांनी जनगणना भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी याविषयी ही माहिती दिली. शहा यांनी सांगितल्याप्रमाणे, केंद्र शासनाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आता मतदार यादीशी लिंक केल्या जाणार आहेत.
यामुळे आता एखाद्या भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती लगेचच भारतीय निवडणूक आयोगाला मिळणार आहे. याचा फायदा असा होईल की, मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.
तसेच आयोगाकडे जन्माची देखील नोंद राहील म्हणून एखाद्या व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण केली की आपोआप त्याचे नाव डिजिटल मतदार यादीत नोंदवले जाईल. यामुळे वयाचे 18 वर्षे पूर्ण झाली की कोणालाच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी कुठे जावे लागणार नाही अशा व्यक्तीचे ऑटोमॅटिक मतदार यादीत नाव समाविष्ट केले जाईल.
हे पण वाचा :- बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत निघाली लिपिक पदाची मोठी भरती, पदवीधर तरुण राहणार पात्र, आजच करा अर्ज