Electricity Bill : अलीकडे, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तसेच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे. यासोबतच इलेक्ट्रिसिटी चे बिल देखील गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. महावितरण सातत्याने इलेक्ट्रिसिटीचे रेट वाढवत आहे.
खरे तर, आधी मानवाच्या तीनच मुख्य गरजा होत्या. अन्न वस्त्र आणि निवारा या तीनच गरजा मूलभूत समजल्या जात. मात्र आता मानवाच्या गरजा सातत्याने वाढत आहेत आणि वीज ही देखील मानवाची एक महत्त्वाची गरजच बनली आहे. विजेचे महत्व गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

पण विजेचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय आणि यामुळे काहीजण नाईलाजाने विजेचे बिल कमी करण्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट सुद्धा वापरत असतात. सोशल मीडियामध्ये देखील विजेचे बिल कमी करण्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट सांगितले जातात.
त्यातलाच एक जुना आणि प्रसिद्ध शॉर्टकटचा फॉर्म्युला म्हणजे मीटरमध्ये चुंबक वापरण्याचा. असे म्हटले जाते की मीटरमध्ये जर चुंबक लावले तर रीडिंग थांबवली जाऊ शकते आणि यामुळे वीज वापर कमी दाखवला जातो. यामुळे आता आपण याचबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर मीटर मध्ये चुंबक लावल्यास रीडींग थांबते हा जो दावा केला जातो तो पूर्णपणे निरर्थक आहे. जाणकार लोकांशी विचारणा केली असता त्यांनी असे म्हटले आहे की हा दावा पूर्णतः खोटा आणि जर असे कोणी करत असेल तर ते कायदेशीरदृष्ट्या गुन्हा समजले जाणार आहे.
मीटर सोबत छेडछाड करणे कायद्याने गुन्हा मानले जाते. जाणकार लोकांच्या मते आधुनिक डिजिटल मीटर आणि स्मार्ट मीटर यामध्ये मॅग्नेटिक इंटरफेरन्सचा काहीही परिणाम होत नाही. म्हणून चुंबक लावून रीडिंग थांबवता येऊ शकते असे समजण्याचे चुकीचे आहे.
कारण की नव्या पद्धतीने जे मीटर डिझाईन करण्यात आलेले आहेत यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञान वापरले जाते, जे सामान्य चुंबकापेक्षा अधिक प्रभावी असते. पण जाणकार लोकांनी असं करणाऱ्या लोकांना ताकीद दिली आहे ते म्हणतात की मीटरमध्ये छेडछाड करणे हे विद्युत चोरी समजले जाते आणि भारतीय विद्युत कायद्यानुसार यासाठी कठोर शिक्षा आणि दंड सुद्धा आकारला जात आहे.
विद्युत विभागाकडे अशा छेडछाड ओळखण्यासाठी आधुनिक साधनं आणि यंत्रणा सुद्धा आहेत. यामुळे असे कोणी करत असेल तर त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. कारण की मीटर छेडछाड प्रकरणात जर कोणी दोषी आढळले तर त्याला 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते सोबतच अशा व्यक्तीकडून मोठा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो.
याही पलीकडे बोलायचं झालं तर मीटरमध्ये चुंबक लावल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते अन शॉर्टसर्किट झाल्यास आगीचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टी टाळणे आवश्यक आहे. या अशा गोष्टी केल्याने विज बिल कमी होणे अशक्य आहे. याउलट या अशा गोष्टींमुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढू शकते.