DA Increase:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प साधारणपणे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर करतील.या येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत. अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाचे महत्त्व तर आहेच परंतु सर्वसामान्यांच्या खिशामध्ये जास्तीचे पैसे येतील अशी जनतेला या माध्यमातून अपेक्षा आहे.
परंतु खासकरून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बघितले तर या अर्थसंकल्पाकडून कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यामागील कारण जर आपण बघितले तर बऱ्याच दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
आगामी अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढवून आठवा वेतन आयोग आणण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. जर सरकारने याबाबतीत काही निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून वाढत्या महागाईचा सामना करण्यास त्यांना मदत होईल.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमके काय?
फिटमेंट फॅक्टर हे एक असं सूत्र आहे ज्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरत असते. या आधारे महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील ठरवले जात असतात. फिटमेंट फॅक्टर जर वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढतो.
जर आपण फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीत बघितले तर यामध्ये शेवटची वाढ 2016 मध्ये करण्यात आली होती व त्यानंतर किमान मूळ वेतन सहा हजार रुपयांवरून तब्बल 18 हजार रुपये करण्यात आले होते.
आता जर त्यामध्ये वाढ केली गेली तर किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26 हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल.
किती होणार पगारात वाढ?
फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये पर्यंत वाढू शकते. म्हणजे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये थेटपणे 8000 रुपयांची वाढ होणे शक्य आहे.
महागाई भत्ता देखील वाढेल
मूळ पगारामध्ये जर वाढ झाली तर महागाई भत्ता देखील आपोआप वाढतो. सध्या महागाई भत्ता म्हणजेच डीए मुळ वेतनाच्या 53% इतका आहे. जर मूळ वेतन 26 हजार रुपये झाले तर महागाई भत्ता देखील त्याच प्रमाणामध्ये वाढेल. महागाई भत्तावाढीचा कालावधी बघितला तर वर्षातून दोनदा म्हणजेच एक जानेवारी आणि एक जुलै रोजी त्यामध्ये वाढ केली जात असते.
महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ केव्हाही जाहीर केली जाऊ शकते. परंतु त्याची वाढ ही एक जानेवारी ते 1 जुलैपासून लागू केली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.परंतु आता या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.