स्पेशल

कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळेल मोठी भेट! महागाई भत्ता होईल 57% व वाढेल पगार?

Published by
Ajay Patil

DA Increse:- येणाऱ्या नवीन वर्ष 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा विचार सरकारच्या माध्यमातून सूरु असून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जानेवारी मध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा करू शकते अशी एक शक्यता आहे व ही वाढ एक जानेवारी 2025 पासून प्रभावीपणे लागू होईल.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जर वाढ झाली तर साहजिकच त्यांच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता असते. महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा असतो

व हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या एक टक्का असतो व दरवर्षी दोनदा त्यामध्ये वाढ केली जाते. जेणेकरून कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल हा त्याचा उद्देश असतो.

त्याच वेळी देशातील निवृत्तीवेतनधारकांना देखील त्यांच्या पेन्शन शी जोडलेली महागाई सवलत दिली जाते व ही दोन्ही भत्ते दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये वाढवले जातात.

केंद्र सरकारची महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा कर्मचाऱ्यांना देईल मोठा दिलासा
केंद्र सरकारच्या माध्यमातून जर महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली गेली तर ती कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे ठरेल. आता सध्या कर्मचाऱ्यांना 53% इतका महागाई भत्ता मिळत आहे व यामध्ये सरकारने जर चार टक्क्यांची वाढ केली तर तो 57% होईल.

म्हणजेच कर्मचाऱ्यांना जो काही मूळ पगार आहे त्याच्या 57% पर्यंत महागाई भत्ता मिळेल. चार टक्क्यांव्यतिरिक्त जर तीन टक्क्यांची वाढ केली तर महागाई भत्ता 56% पर्यंत पोहोचू शकतो. महागाई भत्यातील या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

दरवर्षी केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता वाढीची घोषणा कधी होईल याची प्रतीक्षा करत असतात. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही वाढ मार्चमध्ये जाहीर केली जाते व एक जानेवारीपासून ती लागू केली जात असते.

तसेच जुलैमध्ये जी काही महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याची घोषणा साधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये केली जाते व ही वाढ एक जुलैपासून प्रभावीपणे मांडली जाते. याचप्रमाणे सरकारने जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्याची योजना आखली असून ती अधिकृतपणे कधी जाहीर होईल याबाबत मात्र परिस्थिती अजून पर्यंत स्पष्ट नाही.

महागाई भत्त्याची थकबाकी कधी मिळेल?
कोरोना कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत जवळपास 18 महिन्यांसाठी थांबवण्यात आली होती. त्यामध्ये जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 चे तीन हप्ते थांबवण्यात आलेले होते व ही थकबाकी पर्यंत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही व ही थकबाकी मिळावी अशा पद्धतीची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.

परंतु ही थकबाकी बाबत सरकारने अद्याप पर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की,

कोरोना कालावधीच्या काळात रखडलेली महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची थकबाकी देण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसून त्यामुळे कर्मचाऱ्यांची काहीशी याबाबतीत निराशा होऊ शकते.

कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळवण्यासाठीची प्रतीक्षा दीर्घ काळापासून आहे. त्यामुळे ही थकबाकी कधी मिळेल याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे याबाबत अजून पर्यंत तरी काहीही सांगता येणार नाही.

परंतु कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील वाढ होणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. कारण ते कर्मचाऱ्यांना महागाई पासून दिलासा देण्यासाठी फायद्याचे ठरते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil