EPF Pension : खाजगी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळू शकते याचा आढावा घेणार आहोत. मंडळी, एखाद्या कर्मचाऱ्याने जर एखाद्या खाजगी कंपनीत सलग दहा वर्षे काम केले असेल तर त्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते.
अशा कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून ईपीएस पेन्शन दिली जात असते. ईपीएफओ च्या ईपीएस पेन्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांना दरमहा एक निश्चित पेन्शन दिली जात असते. किमान दहा वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो.
पण दहा वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नेमकी किती पेन्शन मिळते? ही पेन्शन ठरवण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो 1995 पासून ईपीएफओ ने एम्प्लॉई पेन्शन स्कीम म्हणजेच ईपीएस सुरू केले आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेल्या सेवेनुसार पेन्शन मिळत असते.
ईपीएफ मध्ये जे कर्मचारी सदस्य असतात ते कंपनीच्या ठेवींसह ईपीएफओद्वारे त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% पीएफमध्ये योगदान देतात. यात कंपनीने जमा केलेली रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाते, ज्यामध्ये 8.33 टक्के ईपीएस आणि 3.67 टक्के रक्कम ही पीएफमध्ये जात असते.
खरंतर ईपीएस मधून कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपयांची पेन्शन मिळायला हवी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. म्हणून आज आपण दहा वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या अंतर्गत किती पेन्शन मिळू शकते? याची माहिती पाहणार आहोत.
ईपीएस पेन्शन ठरवण्याचा फॉर्म्युला कसा आहे?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएस पेन्शन ही मासिक पेन्शन = (पेन्शनयोग्य वेतन x पेन्शनेबल सेवा)/ 70 या फॉर्म्युल्यानुसार ठरवली जाते. या फॉर्मुल्यामध्ये जे पेन्शनयोग्य वेतन टाकलं जात ते आपल्या मागील 60 महिन्यांच्या वेतनाची सरासरी असते. आता आपण वीस हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती पेन्शन मिळणार हे पाहणार आहोत.
20 हजार पगार असल्यास किती पेन्शन मिळणार?
समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 20 हजार रुपये असेल आणि त्याने दहा वर्षे सेवा दिलेली असेल तर अशा कर्मचाऱ्याला (20000×10) / 70 = 3571 रुपये एवढी मासिक पेन्शन मिळणार आहे.
म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षे काम केले असेल आणि त्याचा पेन्शन योग्य पगार 20 हजार रुपये असेल तर त्याला दरमहा 3571 रुपये पेन्शन मिळणार आहे. सदर कर्मचाऱ्याला वयाच्या 58 व्या वर्षापासून पेन्शनची रक्कम मिळणार आहे.