स्पेशल

EPF Pension | खाजगी कंपनीत 10 वर्षे नोकरी केली असेल अन पेन्शन पात्र पगार 25 हजाराचा असेल तर किती पेन्शन मिळणार?

Published by
Tejas B Shelar

EPF Pension : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जातात. ईपीएफओ पेन्शन योजना ही देखील अशीच एक योजना आहे. आज आम्ही तुम्हाला याच ईपीएफओ पेन्शन बाबत माहिती देणार आहोत.

या ईपीएफओ पेन्शन द्वारे कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन मिळत असते. या पेन्शनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर एखाद्या कर्मचार्‍याने दहा वर्ष नोकरी केली असेल तर तो या पेन्शनसाठी पात्र ठरतो.

किमान दहा वर्षे नोकरी करणारे कर्मचारी या पेन्शनसाठी पात्र ठरतात. दहा वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तर तो व्यक्ती या पेन्शनसाठी पात्र ठरणार नाही.

दरम्यान आज आपण एखाद्या कर्मचाऱ्याने खाजगी कंपनीत दहा वर्षे नोकरी केली असेल आणि त्याचा पेन्शन पात्र पगार 25,000 चा असेल तर त्याला किती ईपीएफओ पेन्शन मिळणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

मंडळी, ईपीएफओ पेन्शनच्या माध्यमातून कर्मचारी किती दिवस काम करतो त्यानुसार त्याचे पेन्शन ठरते. जर एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत दहा वर्षे काम करत असेल आणि त्याचा पीएफ जमा होत असेल तर त्याला पेन्शन मिळते.

खरे तर ईपीएफओ द्वारे 1995 पासून ईपीएस पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत किमान एक हजार रुपयांची पेन्शन मिळते. पण गेल्या काही दिवसांपासून ही किमान पेन्शनची रक्कम 7500 केली गेली पाहिजे अशी मागणी आहे.

विशेष म्हणजे याबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान ईपीएस पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचे पीएफ खाते असले पाहिजे ज्यामध्ये त्याने नोकरीदरम्यान पैसे जमा केले असावेत.

याशिवाय, या योजनेचा लाभ वयाच्या 58 वर्षानंतरच मिळणार आहे. आता ईपीएस पेन्शन मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान आणि कंपनीचे योगदान नेमके कसे असते हे समजून घेऊया. EPF सदस्य त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% EPFO च्या PF मध्ये योगदान देतात अन तेवढीच रक्कम कंपनीद्वारे देखील यात जमा केली जाते.

यातील कंपनीने जमा केलेली रक्कम ही दोन भागांमध्ये विभागली जाते. पहिला भाग हा 8.33 टक्के EPS चा असतो आणि 3.67 टक्के पीएफमध्ये जमा होतो.

10 वर्षे नोकरी आणि पेन्शन पात्र पगार 25 हजाराचा असेल तर

EPS मासिक पेन्शनचा एक फॉर्मुला तयार करण्यात आला आहे. (पेन्शन पात्र वेतन X नोकरीचा कालावधी)/ 70 हा ईपीएस मासिक पेन्शन चा फॉर्मुला आहे. यात पेन्शनपात्र पगार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या 60 महिन्यांच्या म्हणजेच पाच वर्षांच्या पगाराची सरासरी पगार असतो.

कर्मचाऱ्यांचे पेन्शन याचं सूत्राद्वारे ठरविले जाते. आता आपण दहा वर्षे नोकरी केली असेल आणि पेन्शन पात्र पगार 25000 चा असेल तर किती पेन्शन मिळणार हे समजून घेऊयात. जर एखाद्या कर्मचार्‍याने कंपनीत 10 वर्षे काम केले असेल आणि त्याचा पेन्शनपात्र पगार 25,000 रुपये असेल, तर त्याला वयाच्या 58 व्या वर्षापासून 3571 रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com