स्पेशल

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, नवीन EPFO 3.0 प्रणाली लागू होणार ! ‘या’ महिन्यापासून PF चे पैसे…….

Published by
Tejas B Shelar

EPFO PF Rule 2025 : ईपीएफओ च्या सदस्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरेतर z कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (EPFO) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ ने नुकतीचं आपल्या करोडो ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी एक नवीन प्रणाली तयार केली असून ही नवीन प्रणाली या नव्या वर्षात कार्यान्वित होणार आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, नवीन पीएफ प्रणाली जून 2025 पर्यंत लागू केली जाईल. या नवीन प्रणाली अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफचे पैसे काढण्यासाठी नवीन ॲप मिळणार आहे, पीएफ चे पैसे एटीएम मधून देखील काढता येणार आहेत आणि इतरही काही सुविधा या अंतर्गत उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान या नव्या प्रणाली बाबत सरकारकडून आता एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या प्रणाली बाबत अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, EPFO ​​ची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली EPFO ​​3.0 2025 च्या मध्यात लॉन्च केली जाईल.

ही नवीन प्रणाली कर्मचाऱ्यांना सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली अनुभव देण्यास सक्षम राहणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत, सर्व सदस्यांना एटीएम कार्ड दिले जातील. या कार्डद्वारे कर्मचारी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील रक्कम सहजपणे काढू आणि व्यवस्थापित करू शकतील.

विशेषतः आर्थिक आणीबाणीच्या काळात ही सेवा मदत करेल. मंत्री महोदयांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, वेबसाइट आणि सिस्टीममधील सुरुवातीच्या सुधारणा या महिन्यापर्यंत म्हणजेच जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण केल्या जातील. यानंतर EPFO ​​3.0 टप्प्याटप्प्याने लागू होईल.

अर्थातच ही संपूर्ण प्रणाली एकाच टप्प्यात लागू होण्याची शक्यता नाहीये. हळूहळू ही प्रणाली ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. मात्र नव्या प्रणालीमुळे या नवीन वर्षापासून ईपीएफओ सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट एटीएमद्वारे काढू शकतील एवढे नक्की आहे.

म्हणजेच पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची प्रक्रिया आधीच्या तुलनेत आणखी सोपी होणार आहे. साधारणता जून महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे आणि तेव्हापासूनच पीएफ चे पैसे हे एटीएम मधून काढता येणे शक्य होणार असल्याचा दावा होऊ लागला आहे. या प्रक्रियेत कमीत कमी मानवी हस्तक्षेप असेल.

म्हणजेच, कोणत्याही अधिकाऱ्याकडून क्लिअर न करता तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकाल. या प्रणालीमुळे ग्राहकांना एका क्लिकवर त्यांचे दावे निकाली काढता येतील. EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि इतर डिजिटल सेवा देखील सुरू केल्या जातील.

केंद्रीय मंत्री मांडविया यांनी या नवीन प्रणाली बद्दल माहिती देताना असे सांगितले आहे की, नवीन ॲप, एटीएम कार्ड आणि प्रगत सॉफ्टवेअर जून 2025 पर्यंत लॉन्च केले जातील. याशिवाय, कामगार मंत्रालय 12% ची अनिवार्य योगदान मर्यादा काढून टाकण्याचा विचार करत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या बचतीनुसार पीएफमध्ये योगदान देण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो.

याशिवाय कर्मचाऱ्यांच्या संमतीने ही रक्कम पेन्शनमध्ये बदलण्याचा प्रस्तावही समाविष्ट करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीचा म्हणजेच EPFO 3.0 चा उद्देश डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना, ईपीएफओच्या सदस्यांना दिली जाणारी सेवा सोपी, जलद आणि पारदर्शक बनवणे एवढाच आहे.

या उपक्रमामुळे ग्राहकांचा अनुभव तर सुधारेलच पण कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवस्थापनही सुधारणार असा दावा सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे. ईपीएफओच्या या नव्या उपक्रमामुळे करोडो कर्मचाऱ्यांना सुरक्षित पीएफ व्यवस्थापन पर्याय उपलब्ध होणार आहे. जे सध्या तरी उपलब्ध नाही. नक्कीच नवीन प्रणाली ही कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे यात शंकाच नाही.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar