स्पेशल

सगळ्यांची आवडती पल्सर आली नवीन इंजिनसह! बजाजने लॉन्च केली बजाज पल्सर एन 125; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Bajaj Pulsar N 125: भारतीय ग्राहकांमधील जर आपण सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आजपर्यंतच्या बाईक पाहिल्या तर यामध्ये हिरो मोटोकॉर्प तसेच होंडा आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या बाईक्सचा समावेश असल्याचे दिसून येते.

यामध्ये जर बजाज या कंपनीचा विचार केला तर आतापर्यंत या कंपनीने अनेक प्रकारच्या आकर्षक वैशिष्ट्ये असलेल्या बाईक बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेल्या असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज व फीचर्स मिळण्यास मदत झालेली आहे.

बजाजने लॉन्च केलेल्या आतापर्यंतच्या बाईक पाहिल्या तर यामध्ये पल्सर या बाईकला थेट ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे.

बजाज पल्सरची क्रेझ तरुणाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या अनुषंगाने तुम्हाला देखील या दिवाळी सणाच्या निमित्ताने पल्सर घ्यायची असेल तर बजाज ऑटोच्या माध्यमातून 16 ऑक्टोबर रोजी बजाज पल्सर N125 लॉन्च केल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली असून ही बाईक 125cc इंजिन क्षमता असलेली असणार आहे.

 काय आहे बजाज पल्सर N125 मध्ये खास?

ही एक प्रीमियम कम्प्युटर बाईक असून शहरी रायडिंगसाठी खास करून डिझाईन करण्यात आलेली आहे. या बाईकमध्ये मस्क्युलर फ्युएल टॅंक, एलईडी हेडलाईट तसेच ट्वीन एलईडी टेल लाईट इत्यादी सोबत आकर्षक डिझाईन देण्यात आलेली आहे.

त्यासोबतच स्प्लिट सीट, रुंद असा हॅण्डल बार आणि पिलियनसाठी पारंपारिक ग्रॅब रेल देण्यात आली आहे. ही बाईक तिचा स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट अशा फीचर्स सह आरामदायी अशा राईडचा अनुभव देऊ शकणार आहे व दररोजच्या प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

या बाईकमध्ये 125cc एअर कुल्ड इंजिन देण्यात आलेले असून जे 11. 8 बीएचपी पावर आणि 10.8 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे पाच स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे.

जर आपण या बजाज पल्सर N125 चे इतर वैशिष्ट्य बघितले तर या बाईकमध्ये मागील मोनो शॉक सह पारंपारिक असे टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स देण्यात आले असून फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रमचे कॉम्बिनेशन यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या बाईकच्या टॉप मॉडेल मध्ये रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

 किती आहे या बाईकची अपेक्षित किंमत?

सध्या बजाज ऑटोच्या पल्सर 125 आणि पल्सर NS125 ची किंमत पाहिली तर ती अनुक्रमे 92 हजार 886 व 1 लाख 1 हजार रुपये इतकी आहे. या अनुषंगाने बजाज पल्सर N125 ची किंमत एक लाख रुपये पर्यंत अपेक्षित आहे.

Ajay Patil