स्पेशल

Fact Of Snake: जगातील सर्वात लहान, मोठा आणि विषारी साप कोणता? वाचा सापाबद्दलच्या काही रोमांचक गोष्टी

Published by
Ajay Patil

Fact Of Snake:- सापाबद्दल आपण अनेक गोष्टी अगोदर ऐकलेल्या असतील. यामध्ये सापांना कान नसतात मग ते कसे ऐकतात? प्रत्येक साप विषारी असतो का? असे अनेक प्रकारचे प्रश्न सापाबद्दल आपल्या मनात निर्माण होतात. सापांंबद्दल जर विचार केला तर 130 दशलक्ष वर्षांपासून जगामध्ये साप अस्तित्वात आहे असे म्हटले जाते.

म्हणजेच डायनासोरचे अस्तित्व जेव्हा होते तेव्हापासून या जगात साप आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापांचे शरीर केराटिन नावाच्या पदार्थापासून बनलेले असते. याच केराटीन पासून मानवी नखे तयार होतात. अशा अनेक प्रकारच्या रोमांचित गोष्टी सापाबद्दल आहेत. परंतु याहीपेक्षा काही महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 जगातील सर्वात लहान साप कोणता?

जगातील सर्वात लहान सापाचा विचार केला तर थ्रेड स्नेक या प्रजातीला जगातील सर्वात लहान साप मानले जाते. याची लांबी चार इंच म्हणजेच 10 सेंटीमीटर इतकी असते व हा बार्बाडोस या कॅरिबियन बेटावर आढळून येतो असे म्हणतात.

 जगातील सर्वात लांब साप कोणता?

पायथन रेटीक्युलेट्स म्हणजेच आपण त्याला आपल्या भाषेत अजगर असे म्हणतो व याला जगातील सर्वात लांब साप मानले जाते. हा साप तीस फूट लांबी पर्यंत वाढू शकतो असे देखील म्हटले जाते. अजगराची वैशिष्ट्य म्हणजे हा भक्षाला जिवंत गिळतो आणि तेही संपूर्णपणे. अजगराच्या पोटामध्ये शक्तिशाली असे पाचक रसायने असतात जे हरणाच्या शिंगांना देखील सहज पचवू शकता. ही एक बिनविषारी सापाची प्रजात असून आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये आढळून येते.

 जगातील सर्वात विषारी साप

जगातील सर्वात विषारी सापाचा विचार केला तर बेल्चर सी स्नेक याला जगातील सर्वात विषारी साप मानले जाते. या बाबतीत असे म्हटले जाते की या सापाच्या विषाचे काही थेंब एक हजार लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहेत. हा साप पाण्यात राहतो व त्यामुळे लोकांचे जास्त नुकसान करू शकत नाही. यामध्येच दुसरी एक जात म्हणजे आंतरदेशीय तैपण ही होय. जमिनीवर राहतो व त्यामुळे लोकांसाठी तो अति धोकादायक असतो.

या जातीच्या सापाचे विष कोब्राच्या विषापेक्षा 50 पट जास्त प्राणघातक आहे. जगातील सर्वाधिक विषारी साप ब्राझीलमध्ये आढळून येतात. त्या ठिकाणी प्रत्येक चौरस मीटर मध्ये पाच साप असतात म्हणजे एका बेडच्या जागेत 10 साप आणि डबल बेडच्या जागेत वीस साप असतात. तसेच विषारी सापांमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळणारा ब्लॅक मांबा हा देखील सर्वात धोकादायक साप म्हटला जातो. याच्या चाव्यामुळे 95% लोकांचा मृत्यू होतो.

 सापाबद्दल काही महत्त्वाच्या मनोरंजक गोष्टी

जगामध्ये 2500 प्रजाती सापांच्या असून यापैकी फक्त 20 टक्के प्रजाती विषारी असतात. सापांचे जबडे अतिशय लवचिक असल्यामुळे ते त्यांची शिकार सहजपणे गिळतात. साप त्यांच्या आयुष्यात एक किंवा दोनदा त्वचा बदलतात आणि जुनी त्वचा काढून टाकतात ज्याला स्लॉ असे म्हणतात. सापाला ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता एक ते दोन दिवस लागतात. तसेच सापांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सापांच्या 70% प्रजाती अंडी घालतात आणि उर्वरित 30 टक्के प्रत्यक्षरीत्या पिल्लांना जन्म देतात.

Ajay Patil