अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- १८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले.
कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर घटकांमुळे पिवळ्या धातूचे दर मागील आठवड्यात घसरले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
पिवळ्या धातूतील गुंतवणूकदारांचा रस वाढला: अमेरिका आणि इतर देशांमध्ये वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमुळे महामारी पुन्हा डोके वर काढण्याच्या चिंतेमुळे शेअर बाजाराला धक्के बसत आहेत, कारण संसर्गजन्य डेल्टा व्हेरिएंट आणखी पकड बसवण्याची चिन्हे आहेत.
यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी ३० जुलै रोजी संपलेल्या एफओएमसी बैठकीत म्हटले की, फेडकडून समर्थन मागे घेण्यापूर्वी अमेरिकी जॉब मार्केटला अजूनही संरक्षणासाठी थोडा आधार आहे.
तसेच अनिश्चित जागतिक वृद्धीचा अंदाज आणि वाढती महागाई असतानाही सहज चलन धोरण चालूच ठेवण्याची वचनबद्धता मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा दर्शवल्यामुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकीत वाढ झाली.
अमेरिकेतील नोकऱ्यांचे चित्र अधिक चांगले: अमेरिकेतील रोजगाराच्या अंदाजानुसार ६ ऑगस्ट २०२१ रोजी अमेरिकन कामगार विभागाने जारी केलेल्या गैर कृषी पेरोल आकडेवारीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. यात अमेरिकन नियोक्त्यांनी एका वर्षात सर्वाधिक कामगार नियुक्त केले आणि वेतनही वाढवले.
गेल्या महिन्यात गैर कृषी पेरोलमध्ये ९,४३००० नोकऱ्या वाढल्या. ऑगस्ट २०२० नंतरचा हा सर्वात मोठा नफा ठरला. मे आणि जूनमधील आकडेवारीतही सुधारणा आहे. ११९,००० नोकऱ्या या दरम्यान निर्माण झाल्या. बेरोजगारीचा दर १६ महिन्यांत ५.४ टक्क्यांनी घसरला. फेडच्या अधिकाऱ्यांनी अधोरेखित केलेल्या नोंदींद्वारे, कामगार बाजारात सुधारणेच्या पार्श्वभूमीवर महामारीचे युग परतण्याची शक्यता लवकरच असल्याचे दिसते.
मागील काही आठवड्यांत मनी मॅनेजर्सचे सोन्याकडे दुर्लक्ष: ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत, म्हणजेच गेल्या काही आठवड्यात नेट लाँग्सचे १,०६,६६२ करार एकत्रित झाले, २० जुलै २०२१ रोजी ते १,०८,८१५ एवढे होते. पिवळ्या धातूतील फंड मॅनेजर्सचे आकर्षण ओसरत चालल्याचे हे संकेत या घसरणीतून मिळतात. त्यामुळे पुढील आठवड्यात पिवळ्या धातूत आणखी मंदी येऊ शकते.
सोन्याचे पुढे काय होणार? सोन्याच्या बाजारावर अनेक विरोधाभासी घटकांचा परिणाम होतो. एका बाजूला डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे तर कामगार बाजारातील सुधारणा अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकते, यामुळे सोन्याच्या बाजारात दीर्घकाळासाठी असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये द्विधा मन:स्थिती दिसू शकते.
परिस्थिती काहीही असो, प्रत्येक वळणावर सोने जमा करावे लागते आणि सोन्याच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या सुधारणेमुळे ज्यांनी आधीची सुधारणेची संधी गमावली आहे, त्या गुंतवणूकदारांना अनुकूल संधी मिळाली आहे. महिन्याच्या दृष्टीकोनातून, ४७,५०० रुपयांच्या अपसाइड टार्गेटकरिता, ४५,५००-४६,००० रुपयांच्या झोनमध्ये सोने जमा करण्याची आमची शिफारस आहे.