Farmer Scheme:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आता केला जात आहे. त्यासोबतच तंत्रज्ञानासाठी काही पायाभूत सुविधांची गरज भासते व अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक शेतीसंबंधीत योजना अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करतात व त्यामुळे अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसंबंधीत आवश्यक गरजा तसेच पायाभूत सुविधांची उभारणी करणे शक्य होते.
तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितले तर आता शेतीमध्ये ड्रोनचा वापर ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत असून पिकांवरील फवारणी सारखे अवघड काम ड्रोनच्या माध्यमातून शक्य झालेले आहे. परंतु ड्रोनच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करता येईल हे शक्य नाही.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान ड्रोन योजना 2024 सुरू केली असून त्या माध्यमातून देशातील विविध वर्ग आणि विभागातील नागरिकांना ड्रोन खरेदीवर वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान मिळणार आहे.
ड्रोनच्या माध्यमातून शेतकरी फवारणीच नाही तर जमिनीच्या नोंदी तसेच पिकांचे मूल्यमापन व पोषक द्रव्य यासारखी कामे अगदी सहजपणे करू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या कष्ट आणि पैसा दोन्ही वाचण्यास मदत होणार आहे.
काय आहेत किसान ड्रोन योजनेचे फायदे?
फवारणी सारखे अवघड काम कृषी ड्रोनच्या माध्यमातून खूप लवकर करता येणे शक्य होते. जर आपण मजुरांच्या साह्याने एक एकर जमिनीवर फवारणी करायचे ठरवले तर कमीत कमी एक दिवसाचा कालावधी लागतो. परंतु जर ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला एक एकर जमिनीवर फवारणी करायची असेल तर ते अवघे सात ते दहा मिनिटात तुम्हाला फवारणी करणे शक्य होते.
यामुळे कीटकनाशक तसेच खते व औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. तसेच ड्रोनचा वापर हा पाण्याची बचत करण्यासाठी देखील फायद्याचा होतो व पैशांची बचत देखील होते व शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी होतो. तसेच किसान ड्रोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देखील मिळणार असून हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हे ट्रेनिंग घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज भासत नाही. शासनाच्या माध्यमातून हे पूर्णपणे मोफत दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून ड्रोन द्वारे पिकांचे मूल्यांकन तसेच जमिनीच्या नोंदीचे डीजेटायझेशन व कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी देखील चालना मिळते.
शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर किती मिळते अनुदान?
कृषी ड्रोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी केले तर त्यावर अनुदान दिले जाते. देण्यात येणाऱ्या अनुदानाचे स्वरूप बघितले तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच महिला आणि ईशान्यकडे राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोनच्या एकूण किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, jjuk7तर देशातील इतर शेतकऱ्यांना 40% किंवा जास्तीत जास्त चार लाखापर्यंत अनुदान मिळते. तसेच यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 75% पर्यंत सबसिडी मिळते. वैयक्तिक शेतकऱ्यांव्यतिरिक्त मान्यता प्राप्त कृषी प्रशिक्षण संस्था किंवा कृषी विज्ञान केंद्रांना ड्रोन खरेदी करिता कृषी यांत्रिकीकरणावरील उप-मशीन अंतर्गत शंभर टक्के अनुदान मिळते.
या योजनेसाठी कुठे कराल अर्ज?
किसान ड्रोन वर अनुदान मिळवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट किंवा तुमच्या तहसीलमधील जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन या योजनेकरिता ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येतो.