स्पेशल

Farmer Success Story: शेतकरी शेतीतून कमवतो वार्षिक दीड कोटी !

Published by
Ajay Patil

Farmer Success Story: व्यक्ती जीवनामध्ये जेव्हा यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करून दिवस काढावे लागतात. परंतु यशाचा ध्यास घेतलेले व्यक्ती जरी उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करत असतील.

परंतु त्यांच्या मनामध्ये नेहमीच काहीतरी नवीन आणि उच्च स्वरूपाचे काहीतरी करावे व यश मिळवावे हे सतत चालू असते. ते नुसते या गोष्टीचा विचार करत नाही तर त्याकरिता प्रयत्न देखील करत असतात. असे करता करता त्यांना  यशाच्या रस्त्याकडे जाणारी एक किरण दिसते व ते त्या मार्गाने मार्गक्रमण करून यश मिळवतात.

या अनुषंगाने जर आपण शेती क्षेत्रातील अनेक यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा पाहिली तर आपल्याला हा मुद्दा ठळकपणे दिसून येतो. अनेक शेतकऱ्यांनी काबाडकष्ट केलेले आहेत व नंतर शेतीमध्ये  आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रातून आज ते उत्पादन मिळवत असून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल देखील करताना दिसून येत आहेत.

अगदी याच पद्धतीची संघर्षकथा आपल्याला धाराशिव येथील शेतकरी रामराजे गोरे आणि नागेश गोरे या गोरे बंधूंची घेता येईल. एकेकाळी नाला बिल्डिंगमध्ये देखभाल कामगार म्हणून काम करणारे गोरे बंधू आज शेतीच्या माध्यमातून वर्षाला दीड कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवत आहे.

 गोरे बंधूंनी मिळवले शेतीमध्ये दैदीप्यमान यश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव येथील शेतकरी रामराजे आणि त्यांचे बंधू नागेश गोरे यांचे जर शेती क्षेत्रामधील आपण काम बघितले तर ते इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी असे आहे. हे दोन्ही बंधू मूळचे धाराशिव मधील भूम तालुक्यात असलेल्या अंतरगावचे राहणारे आहेत.

गोरे बंधुपैकी रामराजे गोरे यांनी 1993 मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले होते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना उदरनिर्वासाठी नाला बांधण्याच्या कामाला जावे लागायचे. याच कालावधीमध्ये त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा देखील प्रयत्न करून पाहिला.

परंतु या प्रयत्नामध्ये देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी मात्र पुणे शहर गाठले आणि काही काळ टेल्को मध्ये काम केले. हा सगळा संघर्षमय प्रवास सुरू असताना त्यांच्या मनात आले की आपण शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचे व शेतीमध्येच आपले करियर करायचे.

हा विचार आल्यानंतर त्यांनी पुण्यातील टेल्कोतील नोकरीला रामराम ठोकला आणि गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे जी काही पैशांची बचत होती त्यातून त्यांनी प्रथम विहीर खोदण्याला प्राधान्य दिले व विहीर खोदल्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली.

या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना त्यांचे भाऊ नागेश गोरे यांची देखील मोलाची मदत लाभली. दोघा भावांनी मिळून शेतीमध्ये अनेक प्रयोग करून यश मिळवले.

 अशा पद्धतीचे आहे गोरे बंधूंची शेती

शेती करत असताना शेतीमधून जे काही उत्पन्न त्यांना मिळत होते ते उत्पन्न ते शेतीमध्ये गुंतवू लागले व त्यांनी हळूहळू शेतीमध्ये तीन विहिरी खोदल्या व दीड एकर पासून सुरू झालेला त्यांचा शेतीचा प्रवास आज शेतामध्ये तीन विहिरी तसेच नऊ एकर द्राक्ष, तीन एकर डाळिंब आहे

व सात एकर क्षेत्रामध्ये त्यांनी मिरचीची लागवडी पर्यंत आला असून या संपूर्ण तीन विहिरींच्या माध्यमातून या पिकांना ते पाण्याचे व्यवस्थापन करतात.

या सगळ्या शेती पिकाच्या माध्यमातून ते भरघोस उत्पादन घेतात व वर्षाला दीड कोटी रुपये पर्यंत कमाई करत आहेत. अशाप्रकारे गोरे बंधूंचा एक नाले बांधकाम कामगार ते करोडपती शेतकरी होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे.

Ajay Patil